Maharashtra Assembly Polls: अजित पवारांच्या २३ जागा फिक्स, १६ अवघड, १० अशक्य; राष्ट्रवादीच्या सर्व्हेनं महायुतीचं टेन्शन वाढलं

Maharashtra Vidhan Sabha Election : सर्व्हेनुसार, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. 39.3% लोकांच्या मते महायुतीचं राज्यात पुन्हा सरकार येईल. तर ३८.६ टक्के लोकांच्या मते राज्यात मविआ सत्तेत येईल.
Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Latest NewsSaam TV
Published On

Maharashtra political News : विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना हवं तसं यश मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. लोकसभेप्रमाणेच अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीवेळी निराशाच पदरी पडू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये महायुतीची राज्यातील स्थिती सुधारत असल्याचे दिसतेय. पण राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त २३ जागांवर निवडून येण्याची शक्यता आहे. अतिरिक्त 16 जागा जिंकण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील. मात्र, उर्वरित 31 जागांवर परिस्थिती प्रतिकूल आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसकडून ७० जागांवरील सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये त्यांना २३ जागांवर सहज विजय मिळेल, असा समोर आले. तर १६ जागांसाठी आणखी प्रयत्न करावे लागतील, असा कौल देण्यात आलाय. ३१ जागांवरील परिस्थिती पक्षासाठी प्रतिकूल असल्याचेही समोर आलेय.

शिवसेना-भाजपची मदत लागणार -

ज्या ३१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिकूल स्थिती आहे. त्यामधील २१ जागा जिंकण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या मतांची गरज लागणार आहे. शिवसेना आणि भाजप यांची मते व्यवस्थित ट्रान्सफर झाली तर अजित पवारांचे २१ आमदार निवडणून येतील. इतर 10 जागांवर पक्ष लक्षणीय पिछाडीवर आहे.

Ajit Pawar Latest News
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट; या तारखेला एकाच टप्प्यात होणार मतदान? आचारसंहिता कधी?

राष्ट्रवादी काँग्रेसला हव्यात ७० जागा -

आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७० जागा हव्यात. महायुतीमध्ये यावरुन चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १०० पेक्षा जास्त तर भाजप १५० पेक्षा जास्त जागा हव्यांवर लढण्यासाठी तयारी करत आहेत. जागावाटपावर महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याचं बोलले जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ६० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महायुतीची संधी वाढतेय, सर्व्हेत मोठा दावा -

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसला होता. त्यामधून आता परिस्थिती बदललेली दिसत आहे. सप्टेंबरमधील सर्व्हेनुसार, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. 39.3% लोकांच्या मते महायुतीचं राज्यात पुन्हा सरकार येईल. तर ३८.६ टक्के लोकांच्या मते राज्यात मविआ सत्तेत येईल.

ऑगस्टमध्ये महायुती सत्तेत येण्याची शक्यता 37.01% इतकी होती. तर मविआला 42.43% लोकांनी पसंती दर्शवली होती. जुलैमध्ये यापेक्षाही खराब स्थिती होती. जुलैमध्ये महायुतीच्या बाजूने फक्त 34.68% लोक होते तर मविआच्या बाजूने 43.2% मते होती.

Ajit Pawar Latest News
Maharashtra Politics: 'पितृपक्षानंतर मोठा निर्णय...', हर्षवर्धन पाटलांचं ठरलं; अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं

अजित पवारांची कामगिरी -

उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या कामगिरीवर लोक मोठ्या प्रमाणात समाधानी आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. अजित पवारांच्या कामगिरीवर 48.38% लोक खूप समाधानी आहेत, आणि 10.07% समाधानी आहेत. फक्त 4.28% काहीसे असमाधानी आहेत, तर 27.61% खूप असमाधानी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com