२०२४ च्या विधानसभा निवडणूकांमध्ये 1995ची पृनरावृत्ती होऊ शकते असं चित्र सध्या तरी दिसतंय. निवडणूकीतील प्रत्येक उमेदवाराला विरोधी पक्षासोबतच बंडखोरांनी मोठं आव्हान उभं केलंय. पाहूया हा एक रिपोर्ट..
महाराष्ट्रात 1995ची पुनरावृत्ती होणार असल्याची शक्यता आहे. कारण या निवडणूकीत बंडखोरीचं मोठं ग्रहण लागलं असून युती आघाडीला याच बंडखोरांचं सुतक आहे. यंदा 288 जागांसाठी 30 पट अधिक म्हणजेच 8 हजार 272 उमेदवार रिंगणात आहे.
त्यामुळे बंडखोरांनी सगळ्याचंच ब्लडप्रेशर वाढवलं. 29 वर्षांपूर्वी म्हणजेच 1995ला अशाच पद्धतीनं मोठ्या संख्येनं बंडखोरांनी सगळ्या प्रमुख पक्षाचं टेन्शन वाढवलं होतं.
1995 साली बंडखोरांनी सगळ्या पक्षांच्या नाकीनऊ आणले होते. आज 29 वर्षांनंतर बंडखोरांनी काय आव्हान दिलं पाहूया. 2024 बंडखोरीला उधाण आलं आहे. 2024 निवडणूकीत 150 जणांनी बंडखोरी केली आहे.शेवटच्या दिवशी 49 बंडखोरांना थंड करण्यात पक्षांना यश आले आहे. सध्या 30 हून अधिक बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
बंडखोरांचं आव्हान मजबूत असतं हे कोल्हापूरात पहायला मिळालं. एका साध्या कार्यकर्त्यांनं राज घराण्याला मिळालेली अधिकृत उमेदवारी मागे घ्यायला लावली. राज्यभरात विरोधी पक्षासोबतच बंडखोरीवर नियंत्रण मिळवणं हे एक मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे पक्ष फोडून, नेत्यांना पक्षात घेऊन केलेल्या युती-आघाडींना भेदून बंडखोर पुन्हा 1995ची पृनरावृत्ती करतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.