Karjat -Jamkhed Constituency: कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे; भाजप आणि शरद पवार गटात अटीतटीची लढत

Rohit Pawar VS Ram Shinde In Election: कर्जत जामखेडमध्ये पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. कर्जत जामखेडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी(शरद पवार गट) अशी लढत होणार आहे.
MLA Rohit Pawar and Ram Shinde
ram shinde And mla rohit pawarsaam tv
Published On

सुशील थोरात,साम टीव्ही प्रतिनिधी

अहिल्यानगर मधील जामखेड कर्जत मतदारसंघात पुन्हा रंगणार आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात लढत आपला तो आपलाच आणि बाहेरचा उमेदवार... या मुद्द्यावरच होणार यावर्षी निवडणूक होणार आहे.

अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ हा गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात सर्वात चर्चेचा मतदारसंघ राहिला आहे 2019 मध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून रोहित पवार यांनी निवडणूक लढवली होती रोहित पवार हे बारामती वरून थेट कर्जत जामखेड मतदारसंघात येऊन निवडणूक लढवून त्यांनी ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली होती तर सलग तीन वेळा आमदार राहिलेले भाजपचे तात्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता आमदार राम शिंदे हे विधान परिषदेवर निवडून गेले असले तरी पुन्हा एकदा ते विधानसभेमध्ये आपले नशीब आजमवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यावर्षी पुन्हा पवार विरुद्ध शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी सह इतर काही पक्ष निवडणुकीत उतरले असले तरी सध्या तरी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे....

MLA Rohit Pawar and Ram Shinde
Maharashtra Politics: जाहिरातीवर खर्च केला नसता तर..., 'लाडकी बहीण' योजनेवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर निशाणा

१९७२ साला पासून फक्त कर्जत हा मतदारसंघ अस्तित्वात होता 1972 च्या निवडणुकीत रावसाहेब निंबाळकर हे या मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी झाले होते तर त्यांच्या विरोधात भारतीय जनसंघाचे मुरलीधर झरकर हे विरोधात उभे होते त्यानंतर 1978 साली हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव करण्यात आला होता यावेळी या मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दशरथ कांबळे विजय झाले होते. तोपर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र 1995 साली भाजपचे सदाशिव लोखंडे यांनी विजय मिळवला १९९५ ते २००४ पर्यंत या ठिकाणी लोखंडे यांनी आमदार संघ भाजपचा बालेकिल्ला बनवून ठेवला होता. 2009 साली या कर्जत आणि जामखेड तालुक्याचा समावेश करून या मतदारसंघाचे पुनर्रचना करण्यात आली आणि कर्जत जामखेड हा नवीन मतदार संघ तयार करण्यात आला 2009 मध्ये भाजपच्या वतीने राम शिंदे यांनी बाजी मारली 2014 पर्यंत राम शिंदे या मतदारसंघात निवडून आले 2019 साली रोहित पवार यांनी या ठिकाणी राम शिंदे यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या मतदारसंघावर फडकवला होता. या मतदारसंघात प्रामुख्याने वंजारी ,माळी ,धनगर दलित आणि मुस्लिम समाजाचे मोठ्या प्रमाणात प्रभुत्व आहे त्या तुलनेत मराठा समाज कमी असल्यामुळे या ठिकाणी आजपर्यंत ओबीसी समाजाचे मोठे प्रभुत्व निवडणुकीत दिसून आले. काही अपवाद वगळता या ठिकाणी ओबीसी समाजाचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेला आहे.

एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध असणारा आणि सध्या एक नव्हे तर दोन आमदार असणारा आणि आता प्रगतीच्या दिशेने धावणारा कर्जत जामखेड मतदारसंघात थंडीत वातावरण चांगलेच तापले आहे.

कर्जत जामखेड विधानसभेत मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस...

विद्यमान आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तर विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आमदारांपैकी एक....

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ हा राज्याच्या लक्ष वेधून घेणारा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात 3 लाख 20 हजार 843 मतदार संख्या आहे. या मतदारसंघावर रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार आहेत.

2019 कर्ज जामखेड विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पाहुयात

.रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)- 135,824 मते

आघाडी 43,347

प्रा.राम शंकर शिंदे भारतीय जनता पक्ष (भाजप)- 92,477 मते

मतांचा वाटा 38.80%

अरुण हौसराव जाधव (वंचित बहुजन आघाडी)- ३,८४९ मते

मतांचा वाटा १.६१%

2024 मधील कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीतील उमेदवार

1) आमदार रोहित पवार - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

2) प्राध्यापक राम शिंदे - भारतीय जनता पार्टी

3 ) अरुण हौसराव जाधव ( वंचित बहुजन आघाडी )

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत. तर विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत.

2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही भारतीय जनता पार्टीने त्यांना विधान परिषदेवर घेऊन रोहित पवारांना एक शह दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी तालुका म्हणून कर्जत जामखेड या मतदारसंघाची ओळख होती मात्र 2019 च्या निवडणुकीच्या आधी आमदार रोहित पवार यांनी गावोगावी पाण्याचे टँकर पुरवून उन्हाळ्यामध्ये मतदारसंघातील नागरिकांना पाण्याची कमी पडून दिली नव्हती त्यामुळे मतदार संघाच्या बाहेरून आलेल्या नवख्या रोहित पवार यांना कर्जत जामखेडकरांनी स्वीकारून त्यांच्यावर विजयाचा गुलाल उधळला होता मात्र त्या निवडणुकीत तत्कालीन मंत्री असतानाही आणि अनेक खात्यांचा कारभार असतानाही आमदार राम शिंदे यांचा पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागला होता त्यामुळेच भाजपने पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली होती गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. आमदार रोहित पवार यांनी मंजूर केलेली एमआयडीसी सरकारने रद्द करून दुसरीकडे जागा घेऊन तिथे एमआयडीसी मंजूर केली आहे. आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे हे गेल्या पाच वर्षांपासून विकासाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत नुकत्याच झालेल्या कुसडगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभाच्या कार्यक्रमावरूनही मतदारसंघात मोठा कलगीतुरा रंगला होता. कर्जत जामखेडच्या मधून जाणारा राज्य महामार्ग असलेल्या नगर सोलापूर या महामार्गावरून अनेक वेळा कामाचे श्रेय कोणी घ्यायचे यासाठी पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली होती 2024 च्या निवडणुकीत या सर्व प्रश्नांबरोबर भूमिपुत्र आणि बाहेरचा उमेदवार यावर राम शिंदे यांनी चांगलाच जोर दिला आहे

भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून कर्जत जामखेड तालुक्याला मोठा निधी मिळाला आहे आणि 2019 आधी आमदार असताना आणि मंत्री असताना मोठ्या प्रमाणात कर्जत जामखेड तालुक्यात निधी आल्यामुळेच कर्जत जामखेड तालुक्याच्या विकासाचे स्वप्न आता मतदारसंघातील लोक पाहू लागले आहेत आणि त्या निधीवरच मोठा विकास झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जनता मला निवडून देतील आणि परकीय अतिक्रमण आपल्याला चालणार नाही खऱ्या अर्थाने भूमिपुत्राची गरज आहे, असे राम शिंदे म्हणतात

आमदार राम शिंदे (Ram Shinde)

दरम्यान याच मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार हे देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकाम केल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय. अनेक योजना कर्जत जामखेड मतदार संघात आणल्या आहेत रस्ते, पाणी प्रश्न आणि मुख्यता म्हणजे एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्या बाबत पाच वर्ष पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला होता मात्र सरकार आणि येथील स्थानिक नेत्यांनी मला श्रेय मिळू नये म्हणून खोटे आरोप करत एमआयडीसीचा प्रकल्प दुसरीकडे वळाला असला तरी कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांना सर्व गोष्ट माहित आहेत मतदार संघातील प्रत्येक गावात भेटी देऊन विकास कामे केली आहेत तसेच भूमिपुत्र आणि परका आमदार याबाबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक नेते जे दुसऱ्या ठिकाणी जाऊन निवडणूक लढवत आहेत यांचे उदाहरण दिले आहे त्यामुळे हा प्रश्न त्यांना विचारणे गरजेचे आहे असा टोला मारत विकासाच्या जोरावर ही निवडणूक जामखेड कर्जत मतदारसंघातील मतदारांच्या विश्वासावर आपण जिंकून येणार असल्याचा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय

MLA Rohit Pawar and Ram Shinde
Maharashtra Politics: ...तर खपवून घेणार नाही, शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सदाभाऊ खोतांना अजित पवारांचा इशारा

रोहित पवार आमदार (Rohit Pawar)

विद्यमान आमदार रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू असल्यामुळे या मतदारसंघावर शरद पवार लक्ष ठेवून असणार आहेत मागील निवडणुकीतही शरद पवार यांनी कर्जत जामखेड मध्ये येऊन मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या त्यामुळे नवख्या असलेल्या रोहित पवार यांना विजय मिळवता आला असला तरी मात्र पाच वर्षात अनेक गणित बदलले आहेत मराठा आरक्षण तसेच धनगर आरक्षणाचे पडसाद या ठिकाणी उमटू शकतात ओबीसींची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. काही दिवसांपासून भाजपचे आमदार राम शिंदे हे सक्रिय झाल्यामुळे ही लढत मोठ्या चुरशीची होण्याची शक्यता आहे. सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जात असताना राम शिंदे यांनीही मागे न राहता त्यांनीही विविध सांस्कृतिक आणि महिलांचे कार्यक्रम आयोजित करून निवडणुकीच्या प्रचारास जोरात सुरुवात केली आहे. दोन्ही उमेदवारांना एक जोखमीची बाजू म्हणजे विशेषता जामखेड तालुका हा बीड जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे या ठिकाणी जरांगे फॅक्टरचाही मोठा परिणाम जाणवू शकतो त्यामुळे आमदार राम शिंदे यांच्यासमोर जरांगे फॅक्टरचे मोठे आव्हान असू शकते वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी मागील वर्षी उमेदवार दिला होता मात्र वंचित बहुजन आघाडीची जादू चालली नाही कर्जत जामखेड मतदार संघातील रस्ते पूर्वीपेक्षाही चांगले झाले असून आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सुटत आला आहे त्यामुळे फक्त आता बेरोजगारी कमी करण्यासाठी एमआयडीसीचा प्रश्न जो सोडवेल त्या नेत्यामागे कर्जत जामखेड मधील मतदार राहू शकतो त्यामुळे आता या एमआयडीसीच्या मुद्द्यावर आणि आपला तो आपलाच या मुद्द्यावर ही निवडणूक मोठी गाजणार आहे त्यामुळे थंडीतही या मतदारसंघात वातावरण चांगलेच गरम होण्यास सुरुवात झाली आहे.

MLA Rohit Pawar and Ram Shinde
Pune Politics: पुण्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये भाजप गड राखणार की काँग्रेसचा पंजा डाव साधणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com