सचिन कदम, साम प्रतिनिधी
महायुतीमधील राष्ट्रावादी पक्षाला धक्क्यांवर धक्के मिळताना दिसत आहेत. नाराज उमेदावारांच राजीनामा सत्र थांबताना दिसत नाहीये. कोकणातील दोन पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्यानंतर आता रायगडमधील कर्जतमध्ये मोठं खिंडार पडलंय. येथील कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामे दिलेत. उमेदवारी मिळत नसल्यानं पक्षातू आऊटगोइंग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अजित पवार गटाचं टेन्शन वाढलयं.
येथील उमेदवार सुधाकर घारे हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला गेल्याने घारे यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. त्यामुळे नाराज झालेल्या घारे यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. घारे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनीही राजीनामे देत आपल्या विरोध दर्शवला.
सुधाकर घारे कर्जतमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. ते २५ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुधाकर घारे हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय आहेत. कर्जतची जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी सुनील तटकरे हे देखील आग्रही होते, मात्र महायुतीमध्ये असल्याने ही जागा शिवसेनेला गेली आहे. दरम्यान या मतदारसंघात राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे, त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची होती, त्यामुळे ही आपण तसेच आपल्यासोबत इतर कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती घारे यांनी दिली.
कर्जत विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे अशीच प्रमुख लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र सुधाकर घारे हे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवणार हे त्यांनी अनेकदा सभा घेऊन देखील जाहीर केलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा तिढा कायम होता. घारे कधी तुतारी हाती घेणार, तर कधी मशाल अशा चर्चा सुरू होत्या. शेवटी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.