Maharashtra Assembly Election 2024 : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सिल्लोड येथील उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात तब्बल १६ गंभीर प्रकारच्या चुका असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. मालमत्ता, चारचाकी वाहन, हिऱ्यांच्या दागिन्यांबद्दल खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. मगेश शंकरपेल्ली यांच्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून अब्दुल सत्तार यांना २४ तासांचा वेळ दिलाय.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी मालमत्तेची माहिती लपवली असल्याच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली. २४ तासात माहिती देण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांना निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे जिल्हाधिकारी व सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी यांना २४ तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे सरकारमधील अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रातील त्रुटींवर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तब्बल १६ मुद्यांद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार अब्दुल सत्तार यांनी सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये खोटी, भ्रामक व दिशाभूल करणारी माहिती आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा अर्ज फेटाळण्यात यावा, असे म्हटले होते. याची दखल थेट निवडणूक आयोगाने घेतली असून यामुळे निवडणुकीपूर्वीच अब्दुल सत्तार यांची उमेदवारी धोक्यात येते की काय अशी चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.