निवडणूकांसाठी मतदानाची तारीख आता जवळ आलीये. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. अशातच माझ्याविरूद्ध लढण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग होती, पण तुतारीचा उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत असल्याने, आपणच त्यांच्या एका नेत्याला फोन करुन लवकर उमेदवार फायनल करा असं सांगितलं, असल्याचं वक्तव्य अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केलंय. दरम्यान मुंडेंच्या वक्तव्यानंतर एकच चर्चा रंगलीये.
निवडणूकीचे वारे सर्वत्र वाहत असून परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माझ्या विरोधात तुतारीकडून लढण्यासाठी एवढे जण तयार झाले, त्यात काही तुतारीचे निष्ठावंत होते आणि ते मतदारसंघात फिरायला लागले. त्यांच्या नेत्याला विचारून मला भिडायला लागले. मात्र यादरम्यान तुतारीचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असल्यानं, आपणच त्यांच्या एका नेत्याला फोन करुन लवकर उमेदवार फायनल करायला सांगितला, असं मोठं विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
यावेळी नेते येईल त्यांना म्हणायचे कामाला लागा, असं बारा-तेरा जणांसोबत झाल्यावर मलाच यांची काळजी वाटायला लागली. तसं पाहिलं तर तिकीट यातल्या एकालाच मिळणार म्हणून तुतारीच्या एका नेत्याला फोन लावला. यावेळी मी त्यांना सांगितलं, लवकर तिकीट फायनल करा. तिकीट मिळालं नाही ते येडे झाले आणि कागद वेचत फिरायला लागले. परंतु मी इथला लोकप्रतिनिधी आहे, म्हणून त्यांची काळजी वाटली." असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, लोकसभेत जसं केलं, तसंच आता विधानसभेतही हा आयात केलेला उमेदवार देऊन जातीपातीचे राजकारण केलं जात आहे. आणि ते कोण करत आहे हे तुम्हा सर्वांना माहित आहे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवारांवर पुन्हा एकदा शरसंधान साधलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.