Assembly Election: जागावाटपाचा तिढा मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी सोडवावा, दिल्ली श्रेष्ठींचा हुकूम

Assembly Election Mahayuti: महायुतीमधील जागावाटपाचा जो तिढा असेल तो तिढा मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोडवावा असा आदेश दिल्लीतून आलाय.
Assembly Election: जागावाटपाचा तिढा मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी सोडवावा, दिल्ली श्रेष्ठींचा हुकूम
Assembly Election MahayutiHT
Published On

सुरज मसूरकर, साम प्रतिनिधी

महायुतीली जागावाटपाचा असलेला तिढा लवकरात लवकर सोडवण्यात यावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्ली राज्यातील तिढा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसून सोडावावा असा आदेश दिल्ली श्रेष्ठींनी दिलाय. त्यानंतर राज्यातील महायुतीत हालचाली वाढल्या असून मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालंय.

तिढा सोडव्याच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. बैठकीसाठी ते वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. जागा वाटपाबाबत असलेला तिढा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस फडणवीस यांनी बसून सोडवावा असे दिल्लीतून आदेश आलेत. त्यामुळे जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत. आज आज रात्रीपर्यंत दोन्ही पक्षांची शेवटची यादी जाहीर होण्याची शक्यता.

अजित पवार गटाला अजून १० जागा हव्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाने अद्याप ५० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यांना अजून १० जागा हव्या आहेत. त्याबाबत निर्णय होणे बाकी आहे. तर दुसरीकडे महायुतीचा घटकपक्ष असलेल्या आरपीआयला अद्याप एकही जागा मिळाली नाही. रामदास आठवले यांनी महायुतीला दोन जागा देण्याची मागणी केलीय.

याआधी आठवलेंनी आरपीआयला ८ ते १० मागीतल्या होत्या. मात्र किमान २ ते ३ जागा तरी द्याव्यात किंवा विधान परिषद मिळावी. महामंडळ मिळावे. ठिक ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ द्यावे, अशी आमची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलीय. त्याचप्रमाणे उमेदवारीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे.

दरम्यान महायुतीकडून २१५ उमेदवारीची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भाजप

९९+ २२ = १२१

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

३८+ ११ + ४ = ५३

शिवसेना (शिंदे)

४५ = ४५

अशापद्धतीने उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपला किती जागा मिळणार?

भाजपने जागावाटपाचा तिढा सोडवत इतर प्रमुख पक्षांच्या आपल्या बहुतांश उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. अँटी इन्क्मबन्सी, फोडाफोडीचं राजकारण, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांमुळे भाजपासाठी विधानसभा निवडणूक अवघड जाणार असल्याचा दावा केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. तसेच या निवडणुकीत महायुतीचा विजय होईल.

आम्हाला विजयाबाबत पूर्ण विश्वास आहे. बाकी मी आकडा लावणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे आम्ही किती जागा जिंकू याबातत आकडा सांगणार नाही. मात्र या निवडणुकीत महायुतीकडे अनुकूल वातावरण आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि आम्ही मित्रपक्षांसोबत मिळून सरकार स्थापन करेल, एवढं बहुमत आम्हाला मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com