Pune Politics : भाजपमध्येच घमासान! जगताप कुटुंबीयांविरोधात माजी नगरसेवक-पदाधिकाऱ्यांनीच दंड थोपटले

Nepotism In BJP : भाजप नेहमीच राजकारणातील घराणेशाही विरोधात दंड थोपटत असते. मात्र पिंपरी चिंचवडच्या मतदारसंघात होणाऱ्या घराणेशाहीमुळे माजी नगरसेवक नाराज झाले आहेत. त्यामुळे घराणेशाहीच्या मुद्द्यांवरून भाजपातील अंतर्गत वाद होत असल्याचं समोर आले आहे.
Pune Politics: घराणेशाहीविरोधात भाजप कार्यकर्त्यांच बंड; जगताप कुटुंबीयांच्याविरोधात माजी नगरसेवक एकवटले
Pune PoliticsSaam tv
Published On

गोपाल मोटाघरे, साम प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंबीयांच्या घराणेशाहीविरोधात भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक एकवटलेl. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप कुटुंबीयांना उमेदवारी देण्यास भाजपमधील माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार घणाघात करत असतात. आपल्या अनेक निवडणुकीच्या सभांमध्ये आणि रॅलीमध्ये या मुद्द्यांवरून विरोधकांना कोंडीत पकडत असतात. राजकारणातील घराणेशाहीला भाजप विरोध करत असते. मात्र भाजपमध्येच घराणेशाहीला पोषक वातावरण असल्याचं समोर आले आहे. राजकरणातील घराणेशाहीला विरोध करण्यासाठी आता कार्यकर्ते मैदानात उतरलेत. पिंपरी-चिचवडमध्ये होत असलेल्या घराणेशाही विरोधात भाजपच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटले आहेत.

Pune Politics: घराणेशाहीविरोधात भाजप कार्यकर्त्यांच बंड; जगताप कुटुंबीयांच्याविरोधात माजी नगरसेवक एकवटले
Assembly Election: मविआत वाद? जागांच्या मागणीवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष रुसला, जयंत पाटलांना हव्यात हक्काच्या २० जागा

चिंचवड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या जगताप कुटुंबीयांच्या घराणेशाहीच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक एकवटले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य अधिक आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भारतीय जनता पक्षाकडून पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली.

त्या सध्या विद्यमान आमदार आहेत. तर त्यांचे दीर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. त्यांना या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने त्यांच्या या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.

Pune Politics: घराणेशाहीविरोधात भाजप कार्यकर्त्यांच बंड; जगताप कुटुंबीयांच्याविरोधात माजी नगरसेवक एकवटले
Assembly Election: महायुतीच सरकार पूर्ण बहुमताने निवडून येईल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

ही जगताप कुटुंबीय बाहेर देण्यात यावी अन्यथा आम्ही वेगळी भूमिका घेऊ असा इशारा भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते ,संदीप कस्पटे, शत्रुघ्न काटे , माधुरी कुलकर्णी, बाळासाहेब ओवाळ यांनी दिला आहे. आमच्या सोबत पंधरा पेक्षा अधिक माजी नगरसेवक आहेत जगताप कुटुंबीयांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही वेगळा निर्णय घेऊ अशी ठाम भूमिका या माजी नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी घेतली त्यामुळे भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा

विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या पक्षांतराला वेग आलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यादेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा खूप रंगली होती. या चर्चेला अश्विनी जगताप यांनीच पूर्णविराम दिला. पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावतान अश्विनी जगताप यांनी म्हटलं की, "माझ्या पक्षांतराच्या बातम्या खोट्या आहेत.

कोणीतरी हे वावटळ उठवलं आहे आणि त्याला विरोधक खतपाणी घालत आहेत. माझे पती गेल्यानंतर पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि निवडून आणलं. या माध्यमातून त्यांनी माझ्या पतीला श्रद्धांजली वाहिली. ते आणि देवेंद्रजी खूप चांगले मित्र होते. देवेंद्रजी या भागात आल्यानंतर नेहमी आमच्या घरी यायचे. त्यामुळे पक्ष सोडून जाणं हे माझ्या डोक्यात अजिबात नाही," असं त्या म्हणाल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com