विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे, परंतु लोकशाहीला मजबूत करणाऱ्या या मतदान प्रक्रियेला मात्र गालबोट लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. परळी वैजनाथ मतदारसंघातील चार ठिकाणच्या मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना घडल्या असून येथे ईव्हीएमची तोडफोड करण्यात आलीय. ईव्हीएमची तोडफोड झाल्याने या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया बंद पडलीय.
परळी विधानसभेसाठी बुधवारी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील घाटनांदूर येथील सोमेश्वर विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेच्या बुथवरील केंद्राध्यक्ष मुंडे यांना काही युवकांनी मारहाण करत चार मशीनची तोडफोड केली. तेथील केंद्राध्यक्ष मुंडे यांना तात्काळ आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सोमेश्वर विद्यालयातील बुथ क्रमांक २८०, २८१, २८३ आणि जिल्हा परिषद शाळेतील बुथक्रमांक २८२ या केंद्रावरील चार मशीनची तोडफोड करण्यात आलीय. या घटनेचे फोटो देखील समोर आले असून केंद्रात मतदानाचं साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडलंय. दरम्यान केंद्राध्यक्ष मुंडे यांना काही युवकांनी मारहाण केली. यामध्ये मुंडे यांना तात्काळ आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यावेळी पोलीस उपाधिक्षक चोरमले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
दरम्यान परळीतील ईव्हीएम तोडफोड प्रकरणी निवडणूक आयोगाने आपली प्रतिक्रिया दिलीय. मतदान केंद्रावरती कोही लोकांनी एका ईव्हीएम मशीनला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यातली मते शाबूत आहेत. आता ईव्हीएम मशीनही बदलण्यात आलेले आहेत. दोषींवरती कठोर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.