Assembly Election: महाविकास आघाडीने CMचा चेहरा का केला नाही जाहीर? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं कारण

Eknath Shinde: महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार न जाहीर करताच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलाय. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी मविआला टोला मारलाय.
Assembly Election: महाविकास आघाडीने CMचा चेहरा का केला नाही जाहीर? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं कारण
CM Eknath Shinde Interview: Saam tv
Published On

Maharashtra Assembly Election: मविआने सीएमचा चेहरा जाहीर न करता निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यावर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री शिंदेंनी टोला मारलाय. महायुतीने केलेलं कामामुळे महायुतीचेच सरकार येणार आहे. मुख्यमंत्री त्यांचा होणार नाही, त्यामुळे त्यांचा चेहरा ते सांगू शकत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआला लगावलाय.

Assembly Election: महाविकास आघाडीने CMचा चेहरा का केला नाही जाहीर? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं कारण
Assembly Election: महायुतीत वाद? आमचं काम रोजचं त्यांचं काम निवडणुकांपुरत, आमदार सुहास कांदेंवर छगन भुजबळांची टीका

सत्ता परिवर्तन करण्यास जनता उत्सुक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चेहरा महत्त्वाचा नाहीये. आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला समोरे जाणार आहे. त्यामुळे सीएमचा चेहरा जाहीर न करताच निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय मविआच्या तिन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतला. मविआच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांनी मविआला टोला मारलाय.

Assembly Election: महाविकास आघाडीने CMचा चेहरा का केला नाही जाहीर? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं कारण
Assembly Election: हरियाणातील पराभवानंतर महाराष्ट्रासाठी काँग्रेसची नवी प्लानिग; विधानसभा निवडणुकीची आखली रणनीती

रविवारी झालेल्या मविआच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलतांना तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं सीएमचा उमेदवार जाहीर न करण्यावर एकमत झालं.आधी महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, त्यानंतर आम्ही करू असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या विधानाला शरद पवार आणि नाना पटोले यांनीही दुजोरा दिला. आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे,अशी भूमिका मविआच्या तिन्ही नेत्यांनी जाहीर केली. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआला टोमणा मारला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

खरं म्हणजे वस्तुस्थिती त्यांनी विरोधकांनी ओळखलेली आहे.महायुतीने केलेलं काम यामुळे महायुतीचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री त्यांचा होणार नाही, त्यामुळे त्यांचा चेहरा ते सांगू शकत नाही. त्यांची स्पर्धा मुख्यमंत्री पदासाठी नाही विरोधी पक्ष नेत्यांसाठी आहे. माझी त्यांना शुभेच्छा आहेत, विरोधी पक्ष नेत्यांचा चेहरा त्यांनी जाहीर करावा.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने शासन निर्णय घेण्याचा धडाका लावलाय. त्यावरून शरद पवार यांनी सरकारवर टीका केलीय. सरकारने मंत्रिमंडळात अनेक निर्णय घेतले, पण किती निर्णयांची अमंलबजावणी होईल? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलंय. विरोधकांनाही कळून सुचलंय की, एवढे निर्णय घेणारा माहितीचा सरकारची सुवर्ण अक्षरांमध्ये इतिहासात नोंद होईल अशा प्रकारची निर्णय घेतलेल्याचं शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com