Maharashtra Assembly Election : अजितदादांचा मोठा निर्णय, त्या सर्व आमदारांना तिकिट मिळणार, उद्याच यादी जाहीर होणार

Ajit Pawar Maharashtra Politics : अजित पवार यांची ५० जणांची यादी उद्या जाहीर होणार आहे. तीन जणांचे तिकीट कापले जाणार
Ajit Pawar:
Ajit Pawar Maharashtra Politics:
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्याकडून पहिली यादी तयार झाली आहे. अजित पवार यांनी सोबत आलेल्या सर्व आमदारांना पुन्हा तिकिट देण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे.

त्या तीन जणांचे तिकिट कापणार -

अजित पवार गटाची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. ५० उमेदवारांची पहिली यादी असेल, असे समजलेय. विद्यमान आमदारांची ४० नावांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. साथ सोडणाऱ्या तीन जणांना वगळण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत नावांची घोषणा होणार आहे. तीन जणांमध्ये दीपक चव्हाण, बबनदादा शिंदे आणि राजेंद्र शिंगाणे यांचा समावेश आहे.

Ajit Pawar:
Maharashtra Politics: मोठी बातमी! शरद पवारांना ८५ जागा मिळणार, दोन दिवसांत यादी निश्चित होणार, बारामतीमधून युगेंद्र पवार मैदानात?

अजित पवार यांच्या गटात किती आमदार?

1.सरोज अहिरे

2.धर्माबाबा आत्राम

3.बाळासाहेब अजबे

4.राजू कारेमोरे

5.आशुतोष काळे

6.माणिकराव कोकाटे

7.मनोहर चांद्रिकेपुरे

8.दीपक चव्हाण (साथ सोडली, शरद पवारांकडे)

9.संग्राम जगताप

10.मकरंद पाटील

11.नरहरी झिरवाळ

12.सुनील टिंगरे

13.अदिती तटकरे

14.चेतन तुपे

15.दौलत दरोडा

16.राजू नवघरे

17.इंद्रनील नाईक

18.मानसिंग नाईक

19.शेखर निकम

20.अजित पवार

21.नितीन पवार

22.बाबासाहेब पाटील

23.अनिल पाटील

24.राजेश पाटील

25.दिलीप बनकर

26.अण्णा बनसोडे

27.संजय बनसोडे

28.अतुल बेनके

29.दत्तात्रय भरणे

30.छगन भुजबळ

31.यशवंत माने

32.धनंजय मुंडे

33.हसन मुश्रीफ

34.दिलीप मोहिते

35.किरण लहामटे

36.दिलीप वळसे

37.राजेंद्र शिंगणे (साथ सोडली, भूमिका स्पष्ट)

38.बबनराव शिंदे (साथ सोडली, भूमिका स्पष्ट)

39.सुनील शेळके

40.प्रकाश सोळंके

Ajit Pawar:
Maharashtra Assembly Election Date : आजपासून राज्यात आचारसंहिता, प्रचाराचा धुराळा, सध्या कुणाची ताकद किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com