Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Maharashtra Vidhan Sabha Election : बंडखोरी करणाऱ्यांविरोधात भाजपने मोठी कारवाई केली, त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
देवेंद्र फडणवीस
Devendra FadnavisSaam Tv
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीवेळा पक्षविरोधात कारवाई करणाऱ्या ४० बंडखोरांवर भाजपने कारवाई केली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून याआधी बंडखोरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात आली होती. आता भाजपनेही कारवाईचे हत्यार उगारलेय. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका ठेवत तब्बल ४० जणांवर भाजपने गंभीर कारवाई केली आहे. भाजपकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

बंडखोरी करणाऱ्या ४० जणांवर अखेर भाजपकडून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर पक्षाकडून हाकालपट्टी केली आहे. यामध्ये बडनेरा तुषार भारतीय , नालासोपारा हरिश भगत मागठाणे गोपाल जव्हेरी ,सावंतवाडी विशाल परब, श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, अक्कल कोट सुनील बंडगर, अमरावती जगदीश गुप्ता, साकोली सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस
Maharashtra Election : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप, ५२ पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, भाजपला जाहीर पाठिंबा!

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआ आमनेसामने आहेत. तीन तीन पक्ष असल्यामुळे जागावाटप करताना महायुतीला कसरत करावी लागली. काही जागा सोडाव्या लागल्या, तर काही ठिकाणी माघार घ्यावी लागली. भाजपने १४८ जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काही ठिकाणी हक्काच्या जागा सोडल्या. त्यामुळे इच्छूक उमेदवार नाराज झाले होते. त्यांनी पक्षविरोधात जात बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती. पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपने बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले, पण काही जणांनी उमेदवारीवर ठाम राहत उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपकडून कारवाई करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस
Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

कुणावर कारवाई ?

धुळे - श्रीकांत करर्ले, सोपान पाटील

जळगाव - मयूर कापसे, आश्विन सोनवणे

अकोट - गजानन महाले

वाशिम - नागेश घोपे

बडनेरा - तुषार भारतीय

अमरावती - जगतीश गुप्ता

अचलपूर - प्रमोद गडरेल

साकोली - सोमदत्त करंजेकर

आमगाव - शंकर मडावी

चंद्रपूर - ब्रिजभूषण पाझारे

ब्रह्मपूरी - वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली

अमरखेड - भाविक भगत, नटवरलाल अंतवल

नांदेड - वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे

घणसांवगी - सतीश घाटगे

जालना - अशोक पांगारकर

गंगापूर - सुरेश सोनवणे

वैजापूर - एकनात जाधव

मालेगाव - कुणाल सूर्यवंशी

बागलान - आकाश साळुंखे

बागलान - जयश्री गरुड

नालासोपारा - हरिष भगत

भिवंडी - स्नेहा पाटील

कल्याण - वरुण पाटील

मागाठणे - गोपाळ जव्हेरी

जोगेश्वरी - धर्मेंद्र ठाकरू

अलिबाग - दिलीप विठ्ठल भोईल

नेवासा - बाळासाहेब मरकुटे

सोलापूर - शोभा बनशेट्टी

अक्कलकोट - सुनिल बंडकर

श्रीगोंदा - सुवर्णा पाचपुते

सावंतवाडी - विशाल परब

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com