Worli Loksabha Election: मतदान ड्युटी करताना पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा मृत्यू

Worli Loksabha Election Polling Agent : कसबा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा आज पार पडला असून या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघात मतदान पार पडलं. अनेक मतदान केंद्रात सोयी सुविधा नसल्याने मतदार आणि मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
Worli Loksabha Election: मतदान ड्युटी करताना पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा मृत्यू
Worli Loksabha Election Polling Agent

मुंबई: मतदानाची ड्युटी करताना एका पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा मृत्यू झालाय. नलगे यांना तब्येत खालवल्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून कोणतीच सोयी व्यवस्था नसल्याचा आरोप निवडणूक अधिकाऱ्यांनी केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर नलगे यांचे वय ६२ वर्ष होते. ते म्हसकर उद्यान, बी. डी. डी. चाळ ना म जोशी मार्ग, डिलाईल रोड मुंबई १३ येथील रहिवाशी होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा आज पार पडला असून या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघात मतदान पार पडलं. राज्यातील शेवटच्या मतदानाच्या टप्प्यात देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झालं. याबरोबर ईव्हीएममध्ये बिघाड, कार्यकर्त्यांमध्ये राडा आणि मतदान केंद्रावर नसलेल्या सोयीमुळे राज्यातील मतदानाचा पाचवा टप्पा चर्चेत राहिला.

दरम्यान मतदान केंद्रावर आरोग्याच्या दृष्टीने आणि इतर मुलभूत सुविधा नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील केला होता. मुंबईमध्ये आज मतदान पार पडत आहे. परंतु अनेक ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर असुविधा आहे. अनेक ठिकाणी मुलभूत सुविधा नाहीत, तर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत. या समस्यांची दखल घेण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली होती.

Worli Loksabha Election: मतदान ड्युटी करताना पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा मृत्यू
Aaditya Thackeray: मतदान केंद्राबाहेर असुविधा, अनेक तक्रारी; आदित्य ठाकरेंची X अकाउंटवर पोस्ट करत निवडणूक आयोगाला विनंती

याप्रकरणी आमदार सुनील शिंदे प्रतिक्रिया दिलीय. मनोहर नलगे यांचा मृत्यू हा मतदान केंद्रावर झालाय.सहा वाजयला १० मिनिटं बाकी असताना नलगे वॉशरुमला गेले. मात्र तो परत आला नाही, मतदान पेट्या बंद केल्यानंतर पोलिंग एजंटची सही घ्यावी लागते, त्यावेळी तो तिथे दिसत नसल्याने शोधाशोध करण्यात आली. त्यावेळी ते टॉयलेटमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यानंतर आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन आलो असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com