सागर आव्हाड साम टीव्ही, पुणे
उद्या राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान (Lok Sabha 2024) पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग अलर्ट मोडमध्ये आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाने तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अडचणीत येण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधांची माहिती करून घेऊ या.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांमध्ये उद्या पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission Important Decisions) काही महत्वपूर्ण निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आठवडे बाजारावरती बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतदान केंद्रापासुन १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करण्यात आले आहेत.
तसंच मतदान कार्ड नसेल, तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले बारा पुरावे ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांतता, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडावे म्हणुन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. येत्या १३ मे रोजी पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
हे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत. याद्वारे सर्व मंडपे, (Pune Lok Sabha) वाणिज्यिक आस्थापना, दुकाने, मोबाईल, पेजर, कॉडलेस फोन, वायरलेस फोन, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले आणि इतर विद्युत उपकरणे तसेच चिन्हांचे प्रदर्शन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत.
पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी सकाळी ६ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू होत आहे. तेव्हापासून मतदान संपेपर्यंत मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये मतदारांव्यतिरिक्त प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतूद आणि भारतीय दंड विधान कायद्याचे (Maharashtra Election 2024) कलम १८८ नुसार दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, असंही डॉ. दिवसे यांनी सांगितलं आहे.पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.