Sangli Lok Sabha 2024 Winner: सांगलीच्या जागेवर विशाल पाटलांचा दणक्यात विजय; लिफाफा दिल्लीला पोहचला

Vishal Patil Won From Sangli Lok Sabha Constituency: लोकसभा "16 व्या" फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 75 हजार 202 मतांनी आघाडीवर होते तर भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर होते.
Sangli Lok Sabha 2024 Winner:  सांगलीच्या जागेवर विशाल पाटलांचा दणक्यात विजय; लिफाफा दिल्लीला पोहचला
Sangli Lok Sabha Election 2024 Winner Vishal PatilSaam TV

लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विषाल पाटलांचा विजय झाला आहे. विषाल पाटलांनी मोठ्या मताधिक्याने या जागेवर दणक्यात विजय मिळवला आहे. लोकसभा "16 व्या" फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 75 हजार 202 मतांनी आघाडीवर होते तर भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर होते. निकालाबाबत अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.

Sangli Lok Sabha 2024 Winner:  सांगलीच्या जागेवर विशाल पाटलांचा दणक्यात विजय; लिफाफा दिल्लीला पोहचला
Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले

विशाल पाटील यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीचा निकाल पाहून मी भारावून गेलो आहे. एक अपक्ष उमेदवार, वसंतदादांचा नातू लढतोय म्हणून जी साथ मिळाली आहे ती अद्भुत होती, असं विशाल पाटील म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना विशाल पाटलांनी भाजपवर देखील टीका केली. "निवडणुकीत प्रत्येक गोष्टीला अडचणीत आणण्याचे काम भाजपने केले, चिन्ह चोरले, वेगवेगळी आमिष दाखवली, पैशांचा बेफाम वापर केला. सगळं करून सुद्धा माझा आज विजय झाला आहे."

"जनतेचा मी आभारी आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे मला मोठे मताधिक्य मिळाले. संविधानाचा रक्षक म्हणून मी संसदेत जात आहे. संविधानाचे रक्षण करण्याचे काम मी चांगल्या प्रकारे करेन. स्वर्गीय आर आर पाटील, पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली. विश्वजित कदम हे आमचे नेते आहेत. आमची एकी आता कायमची आहे. ते जसे सांगतील तसेच पुढे होईल.", असंही विशाल पाटलांनी म्हटलंय.

Sangli Lok Sabha 2024 Winner:  सांगलीच्या जागेवर विशाल पाटलांचा दणक्यात विजय; लिफाफा दिल्लीला पोहचला
Vishal Patil News | काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील, राजकीय चर्चांना उधाण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com