Sangli Lok Sabha News: सांगलीत अपक्ष विशाल पाटील आघाडीवर, निकालाआधीच उधळला गुलाल

Vishal Patil Leading From Sangli Lok Sabha Constituency: सांगलीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील हे आघाडीवर आहेत. सातव्या फेरीमध्ये देखील ते आघाडीवर आहेत.
Vishal Patil News: सांगलीत विशाल पाटील आघाडीवर, निकालाआधीच कार्यर्त्यांनी जल्लोष करत उधळला गुलाल
Celebration of Vishal Patil's SupportersSaam Tv

विजय पाटील, सांगली

लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) चांगलाच चर्चेत राहिला. या मतदारसंघातून कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढवली होती. हेच विशाल पाटील (Vishal Patil) आघाडीवर आहेत. विशाल पाटील हे ३० हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील आघाडीवर आहेत. सहाव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील ३० हजार ७०१ मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार विशाल पाटील हेच कायम आघाडीवर आहेत. भाजपचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीकडून निवणूक लढवलेले ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे देखील पिछाडीवर आहेत.

Vishal Patil News: सांगलीत विशाल पाटील आघाडीवर, निकालाआधीच कार्यर्त्यांनी जल्लोष करत उधळला गुलाल
Loksabha Election Result: ब्रेकिंग! देशातील पहिला निकाल लागला; मतमोजणीआधीच भाजपने खातं खोललं

सातव्या फेरीमध्ये देखील विशाल पाटील यांची आघाडी कायम आहे. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सांगलीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निकाल लागण्यापूर्वीच विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावून जल्लोष केला. सध्या सांगलीकरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

Vishal Patil News: सांगलीत विशाल पाटील आघाडीवर, निकालाआधीच कार्यर्त्यांनी जल्लोष करत उधळला गुलाल
Kolhapur Loksabha Result Update : हिंगोलीनंतर कोल्हापूरात दोन EVM मशीनध्ये बिघाड

सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती पूजा पाटील यांनीही मतमोजणी केंद्राबाहेर हजेरी लावली आहे. एकंदरीमध्येच सांगलीमध्ये आतापर्यंत जो कल समोर आला आहे त्यावरून विशाल पाटील हेच आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची चर्चा सांगलीमध्ये सुरू आहे.

Vishal Patil News: सांगलीत विशाल पाटील आघाडीवर, निकालाआधीच कार्यर्त्यांनी जल्लोष करत उधळला गुलाल
Uttar Pradesh Loksabha Election Result: उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीने वाढवलं भाजपचं टेन्शन, ४२ जागांवर मिळवली आघाडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com