Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले

Vishal Patil On Sanjay Raut: सांगली लोकसभेत विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरुन बोलताना संजय राऊतांवर इशारा दिला होता.
Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालयं; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले
Sanjay Raut On Vishal Patil Saam Tv

सांगली|ता. ५ मे २०२४

सांगली लोकसभेत विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरुन बोलताना संजय राऊतांवर इशारा दिला होता. त्यावर राऊतांनीही विश्वजित कदम खरे वाघ आहेत का? हे निकालानंतर समजेल, असा टोला लगावला होता. संजय राऊत यांच्या या विधानावरुन आता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.

काय म्हणाले विशाल पाटील?

"विश्वजीत कदम हे वाघच आहेत, आणि संजय राऊतांना वाघ बाहेर कसे शिकार करतो हे कदाचित माहीत नसावं ,त्यांनी एखाद्या चॅनलची डॉक्युमेंटरी बघावी, कारण वाघ संधी बघून झडप घालतात, असा टोला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी राऊतांना लगावला आहे. तसेच संजय राऊत गेले महिनाभर काय बोलतात, का बोलतात ? याचा उलगडा निवडणूक झाल्यावर होईल.." असे विशाल पाटील म्हणाले.

तसेच "विश्वजीत कदम हे काँग्रेसचे भविष्य आहेत, पण विश्वजित कदम यांना नाहक बदनाम करण्याचे आणि घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप देखील विशाल पाटलांनी केला आहे. त्याचबरोबर सांगली लोकसभेत वारं फिरलं नाही तर वाऱ्याचे आता वादळ झाले," त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील विशाल पाटलांनी व्यक्त केला आहे.

Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालयं; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले
Sanjay Raut: 'मौनी खासदारांचे समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी...' संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

तसेच "यंदाची निवडणुक ही वेगळी आहे. प्रचार करणे सोपे झाले आहे. प्रकाश आंबेडकरांमुळे मोठा पाठिंबा मला मिळालेला आहे. आघाडी धर्मात बिघाडी ही संजय राऊतांकडूनच झाली. सांगलीची जागा सुटली नसताना परस्पर उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाने माझ्यावर कारवाई करु नये, करणार नाही..." असेही विशाल पाटील म्हणाले.

Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालयं; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले
Sambhajinagar Crime : जमिनीसाठी दुसऱ्यांदा मजूर महिलांवर हल्ला; जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडून नऊ वाहने जाळली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com