Dharashiv News : निकालाआधीच महायुतीला मोठा धक्का! अर्चना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

Mahayuti Lok Sabha Candidate Archana Patil: धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण अर्चना पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनापरवाना सभा घेतल्याचं समोर आलंय.
अर्चना पाटील
Mahayuti Lok Sabha Candidate Archana PatilSaam Tv

बालाजी सुरवसे, साम टीव्ही धाराशिव

धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या निकालापूर्वीच अडचणी वाढल्या असल्याचं समोर आलं आहे. कारण महायुतीच्या लोकसभा उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल झाल्यामुळे धाराशिवमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. निकालापुर्वीच महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे.

धाराशिवमध्ये महायुतीच्या लोकसभा उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच विनापरवाना सभा घेतली होती. याप्रकरणी त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Dharashiv News) आहे. याप्रकरणी अर्चना पाटील यांच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे. विनापरवाना सभा घेणं अर्चना पाटील यांना चांगलंच भोवलं असल्याचं दिसत आहेत.

अर्चना पाटील यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेतली होती. त्याप्रकरणी त्यांच्यावर सदर कारवाई करण्यात आलेली आहे. ही सभा (Mahayuti Lok Sabha Candidate Archana Patil) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडली होती. परंतु आता अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं चित्र (Dharashiv Lok Sabha) आहे.

अर्चना पाटील
Lok Sabha Result Prediction: महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी, कुणाची जादू चालणार? आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल ४ जून रोजी येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी धाराशिवमध्ये निवडणूक पार पडली होती. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीकडून अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात लढत झाली आहे. आता धाराशिव लोकसभा मतदारसंघात कुणाचा विजय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं (Lok Sabha Election 2024) आहे.

अर्चना पाटील
Lok Sabha Phase 7 Voting : लोकसभेच्या सातव्या टप्प्यात ५७ जागांसाठी आज मतदान; या मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com