Lok Sabha Phase 7 Voting : लोकसभेच्या सातव्या टप्प्यात ५७ जागांसाठी आज मतदान; या मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती

Lok Sabha election 2024 Updates : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज शनिवारी मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल.
लोकसभेच्या सातव्या टप्प्यात ५७ जागांसाठी आज मतदान; या मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती
Lok Sabha Elections 2024 Phase 7 Candidates and Constituency ListSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज शनिवारी मतदान होणार आहे. एकूण ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल. यामध्ये वाराणसी मतदारसंघाचा देखील समावेश आहे. येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. शेवटच्या टप्प्यात मतदार नेमकी कुणाला पसंती देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल.

लोकसभेच्या सातव्या टप्प्यात ५७ जागांसाठी आज मतदान; या मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती
Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या लढती; महत्वाचे मतदारसंघ अन् उमेदवारांची यादी बघा

सातव्या टप्प्यात कोणकोणत्या राज्यांत मतदान

सातव्या टप्प्यासाठी पंजाबच्या सर्व १३, हिमाचल प्रदेशच्या ४, उत्तर प्रदेशच्या १३, पश्चिम बंगालच्या ९, बिहारच्या ८, ओडिशाच्या ६ आणि झारखंडच्या ३ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी एकूण ९०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शेवटच्या टप्प्यात होणार चुरशीच्या लढती

शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती, अभिनेत्री कंगना राणौत, रवी किशन, निशिकांत दुबे या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अंदाजे ५.२४ कोटी पुरुष, ४.८२ कोटी महिला आणि ३,५७४ तृतीयपंथीयांसह १०.०६ कोटीहून अधिक मतदार सातव्या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावतील. आजच्या मतदानानंतर १९ एप्रिलपासून सुरू झालेली मॅरेथॉन मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात येईल. आतापर्यंत २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या ४८६ जागांवर मतदान झाले आहे.

आतापर्यंत कोणत्या राज्यांत किती टक्के मतदान?

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी ६६.१४ टक्के, दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के, तिसऱ्या टप्प्यात ६५.६८ टक्के, चौथ्या टप्प्यात ६९.१६ टक्के, पाचव्या टप्प्यात ६२.२ टक्के आणि सहाव्या टप्प्यात ६३.३६ टक्के इतकं मतदान झालं आहे.

आता सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शनिवारी सायंकाळी ६ वाजेनंतर एक्झिट पोलची आकडेवारी देखील समोर येईल. या आकडेवारीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

लोकसभेच्या सातव्या टप्प्यात ५७ जागांसाठी आज मतदान; या मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती
Maharashtra Politics : महाराष्ट्रात ठाकरेंचीच होणार सरशी, महायुतीला मिळणार फक्त १२ जागा? तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com