Jalna Lok Sabha: भाजप नेत्यांचा आज राज्यात सभांचा धुराळा; दानवेंच्या प्रचारार्थ अमित शाह जालन्यात

Amit Shah Sabha In Jalna: पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. राज्यात आता सर्व राजकीय पक्ष चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून आज राज्यात सभांचा धुराळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे.
Amit Shah
Amit ShahYandex

गणेश कवडे साम टीव्ही, मुंबई

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान (Lok Sabha Election 2024) १३ मे रोजी पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात आता सर्व राजकीय पक्ष चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून आज राज्यात सभांचा धुराळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने लोकसभेच्या जालना मतदारसंघातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. ते सलग सहाव्यांदा लोकसभा निवडणूक लढत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी जालन्यात जाहीर सभा (Union Home Minister Amit Shah) घेणार आहेत. आज अमित शाह दानवेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेच्या माध्यममातून जालन्यात असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज चार सभांचे नियोजन आज करण्यात आले आहे. नंदुरबार, जळगाव, जालना आणि संभाजीनगरमध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही पुण्यात तीन ठिकाणी सभा होणार आहेत.

पुण्यातील बिबवेवाडी, मार्केट यार्ड, मुकुंद नगर येथे बावनकुळे विरोधकांचा समाचार घेणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडत आहे. बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील दाखल झालेले आहेत. काहीच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आता जालन्यात (Jalna) रावसाहेब दानवेंसाठी अमित शाह मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय.

Amit Shah
Amit Shah: उद्धव ठाकरे नकली सेनेचे अध्यक्ष, बाळासाहेबांचे नाव घेऊ नये; अमित शहांची टीका

पुण्यातील महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. येत्या १३ मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्याच्या संदर्भात रणनिती आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे विरूद्ध कल्याण काळे (Amit Shah Sabha In Jalna) अशी लढत होत आहे. अजून जालन्यात कोणत्याही बड्या नेत्याची सभा झालेली नाही. अमित शहांची सभा पहिलीच असणार आहे.

Amit Shah
Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com