Raj Thackeray: मनसेचा शिवाजी पार्कवर आज गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे काय बोलणार?

MNS Gudhipadwa Melava At Shivaji Park: आज मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam Tv

Raj Thackeray Maharashtra Election Lok Sabha

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा (MNS Gudhi Padwa Melava) पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणूका आणि मनसेचा गुढीपाडवा मेळावा, असा योग जुळून आला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  (Maharashtra Lok sabha Election)

आज मनसेच्या मेळाव्यात पोलीस सुरक्षा कशी असेल ते पाहू या. तिनशे पोलीस शिपाई असणार आहेत. तसंच 35 पोलीस अधिकारी सुद्धा सुरक्षेसाठी शिवाजी पार्क मैदानात आज (Maharashtra Politics) असणार आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठी एक विशेष पथक असणार आहे. मनसे कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कमध्ये येण्यास कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून मनसेचे 100 सुरक्षा रक्षक असणार आहेत. ते वाहतुकीसाठी मदत करणार आहेत.सभेच्या ठिकाणी 500 स्वयंसेवक आणि 100 वॉर्डन सुद्धा (MNS Gudhi Padwa Melava At Shivaji Park) उपस्थित राहणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय संबोधित करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महायुतीमध्ये सामील होण्याची चर्चा कुठे येऊन थांबली? भविष्यातील मनसेची (Raj Thackeray Maharashtra Elction) वाटचाल कशी असेल? अशा विविध विषयांवर आज राज ठाकरे बोलणार आहे. त्यासोबतच लोकसभा लढविणार की थेट विधानसभेत उतरणार हे चित्र देखील आज स्पष्ट होईल.

आज शिवाजी पार्कवरील मेळाव्यातून विविध प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. मनसे महायुतील पाठिंबा देईल का, हे चित्र देखील आज स्पष्ट होण्याची शक्यता (Maharashtra Elction) आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची (Raj Thackeray News) भेट घेतली होती. परंतु त्यांनी याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Raj Thackeray
MNS Padwa Melava: शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा; वाहतुकीत मोठे बदल

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आमच्यासोबत येतील, असा विश्वास काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे आमची जवळीक वाढली. त्यामुळे राज ठाकरे नरेंद्र मोदींना (Lok Sabha Elction) पाठिंबा देतील. युतीसंदर्भात चर्चा झाल्या आहेत, आता निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे (Elction) असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. त्यामुळे मनसेचा आजचा गुढीपाडवा मेळावा खास असणार आहे, मनसेची पुढील दिशा आजच्या मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे.

Raj Thackeray
MNS News: मनसे महायुतीत सहभागी होणार का? शर्मिला ठाकरे यांचं नाव घेत राजू पाटील म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com