Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil: कोण डमी अन् कोण डॅडी?, शिरूर लोकसभेत कोल्हे-आढळरावांमध्ये फटकेबाजी

Shirur Loksabha Election 2024: अमोल कोल्हेनी 'आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर फार काही बोलत नाही.', अशी खोचक टीका केली होती. अमोल कोल्हेंच्या या टीकेला आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Shirur Lok Sabha Election 2024
Amol Kolhe Criticized On Shivajirao Adhalrao PatilSaam Tv

शिरूर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Loksabha Election 2024) निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kokhe) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अमोल कोल्हेनी 'आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर फार काही बोलत नाही.', अशी खोचक टीका केली होती. अमोल कोल्हेंच्या या टीकेला आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

आढळराव पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया अमोल कोल्हेंना उत्तर दिले. 'मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे.' असं म्हणत आढळरावांनी पलटवार केलाय. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना तिकीट देणार होते. त्यामुळं आढळराव पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते.', अशी खिल्ली अमोल कोल्हेंनी उडवली होती. त्यावेळी 'अशी विधानं करण्यात कोल्हे अन संजय राऊतांमध्ये साम्य आहे.', असं म्हणत आढळरावांनी कोल्हेची टर उडवली होती. तो विषय संपतो न संपतो आता डमी आणि डॅडी उमेदवारावरून कोल्हे आणि आढळरावांमध्ये जुंपली आहे.

Shirur Lok Sabha Election 2024
Jitendra Awhad: दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सापडले भंगारजमा EVM, VIDEO पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांची सरकारवर निशाणा

भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर टीका केली होती. अमोल कोल्हे यांनी सांगितले होते की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर छगन भुजबळांना शिरुरमधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता.' तसंच, 'मुख्यमंत्री आलेच नाहीत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून जाईल असं नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावरूनच स्पष्ट होतं आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.', असा टोला अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांना लगावला होता.

Shirur Lok Sabha Election 2024
Ajit Pawar : आचारसंहिता भंग झाला नाही! त्या वक्तव्यावर अजित पवारांना मोठा दिलासा

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर मतदार संघ हा एक आहे. या मतदार संघाममध्ये शिरुरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिले आहेत. तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

Shirur Lok Sabha Election 2024
Madha Constituency : शहाजी बापूंची सुपारी फुटली मुंबईत अन् हळद लागली गुवाहाटीत, जानकरांचं उत्तर, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com