Vishal Patil: नाराज विशाल पाटील सांगली लोकसभा निवडणूक अपक्ष लढणार?
विजय पाटील, सांगली
सांगली लोकसभा मतदार संघातून (Sangli Lok Sabha Constituency) विशाल पाटील (Vishal Patil) यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज झाले आहे. विशाल पाटील यांच्यासोबत विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील नाराज होऊन ते आक्रमक झाले आहेत. अशामध्येत आता समोर आलेल्या माहितीनुसार विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतला आहे.
विशाल पाटील हे सांगली लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार आहेत. सोमवारी ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील आघाडी स्थापन करण्याच्या विचारात आहेत. सांगलीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या विशाल पाटील यांना उमेदवारी न देता शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी अर्ज दिला. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण असून कार्यकर्ते संतापले आहेत.
अशामध्ये अखेर सांगलीमध्ये काँग्रेसने बंडखोरी केली आहे. विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने विशाल पाटील यांच्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालतील निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील हे बंडखोरीच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. सोमवारी विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
असे असले तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील विशाल पाटील अद्याप ठाम आहेत. काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत. तसेच आता विशाल पाटील यांच्या स्वीस सहाय्यकाने उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झालीय. तसेच वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे देखील विशाल पाटील यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंग लावत काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसून टाकला. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस शब्द पुसून टाकला. तर दुसरीकडे मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.