लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सोडवताना सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढत आहे. छोटे-छोटे पक्ष आणि नेते प्रस्थापितांना थेट आव्हान देत आहेत. हातकणंगले मतदारसंघातही महायुतीत रस्सीखेच होताना दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून सदाभाऊ खोत देखील आक्रमक झाले आहेत.
आम्ही प्रस्थापितांचे ढोल वाजवायला जन्माला आलो नाही. आम्ही प्रस्थापितांचे गुलाम नाही, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी महायुतीला इशारा दिला. हातकणंगले मतदारसंघ प्रस्थापितांच्या विरोधातला, पण दुर्दैवाने विस्थापितांच्या लढाईत प्रत्येक वेळी प्रस्थापित आमच्या मानगुटीवर बसतो, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
हातकणंगले लोकसभेची जागा रयत क्रांती संघटनेलाच मिळाली पाहिजे. असं सांगतानाच उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.