सुशील थोरात, साम टीव्ही अहमदनगर
लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंकेंची आघाडी दिसली. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अहमदनगर दक्षिणची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
देशातील लोकसभा निवडणुका आता संपल्या आहेत. त्यानंतर एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की, देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भरभरून एनडीएला मतदान केलं आहे. चारसो पारची घोषणा आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे. तसेच महायुतीलाही महाराष्ट्रात घवघवीत यश मिळेल, असा विश्वास (Ahmednagar Lok Sabha Election) आहे. एक्झिट पोल आले आहेत. राजकीय विश्लेषक बोलत आहेत. मात्र, सर्वांचे उत्तर चार तारखेला आपल्या समोर येईल, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश मिळणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) व्यक्त केलाय. सोशल मीडियातून जनतेमध्ये बरीच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला. पण शेवटी जनतेला कामावर विश्वास आहे.आमचे नेते नरेंद्र मोदी आहेत. डॉक्टर सुजय विखे यांनाही त्यांचा आशीर्वाद आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचंही मार्गदर्शन आहे. या जोरावर अहमदनगरची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला (Lok Sabha Election 2024 Result) आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांनी मविआचे उमेदवार निलेश लंके यांना मदत केली. त्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधला आहे. पक्षासाठी काम करण्यापेक्षा इतरांची व्यक्तीद्वेषाने पछाडलेली माणसं (Ahmednagar News) आहेत. स्वतःला काँग्रेस नेते समजतात. मात्र, पक्षाला एकही जागा घेऊ शकत नाही असा टोला त्यांनी थोरातांना लगावला आहे. तसेच दुसऱ्याची तळी उचलण्यामध्ये ते धन्यता मानतात. यातूनच त्यांची वैचारिक दिवाळखोरी सिद्ध होते, असं विखे पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे या तिघांनी देखील स्वतःच्या अस्तित्वाची काळजी करणे गरजेचे आहे, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.