PM Modi In Chandrapur: कमीशन द्या नाहीतर काम बंद करा हेच विरोधकांचं काम; पीएम मोदींचा इंडिया आघाडीवर घणाघात

Pm Narendra Modi Speech : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रमुख स्टार प्रचारकांची मांदियाळी आज विदर्भात दिसून येणार आहे. चंद्रपुरात पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.
PM Modi In Chandrapur: कमीशन द्या नाहीतर काम बंद करा हेच विरोधकांचं काम; पीएम मोदींचा इंडिया आघाडीवर घणाघात

PM Modi Rally in Chandrapur :

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाळीला विदर्भापासून सुरुवात झाली. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात आलेत. विक्रमी मतदान करून सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करा,असे आवाहन पंतप्रधान मोदींनी उपस्थित नागरिकांना केलं. सभेसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित करताना पीएम मोदींनी 'इंडिया' आघाडीवर कडाकडून टीका केली.

तापमानाचा पारा वाढत आहे, त्यात लोकसभेच्या प्रचाराचा पारा वाढला. उकाडा जास्त असताना सुद्धा चंद्रपूरमधील नागरिकांनी सभेला हजेरी लावली, त्यामुळे मोदींनी त्यांचे आभार मानले. दहा वर्षानंतर चंद्रपुरात आलेल्या पंतप्रधान मोदींनी चंद्रपूरने राम मंदिर आणि नवीन संसदेसाठी दिलेल्या योगदानाविषयी चंद्रपूरकरांचे आभार मानले. नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. मोदींनी राज्यातील जनतेला मराठीतून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विरोधकांवर हल्लाबोल चढवला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाची निवडणूक ही स्थिरता आणि अस्थिरताविरुद्ध आहे. एकीकडे भाजप एनडीए आहे,आमचे लक्ष्य देशासाठी कठोर निर्णय घेणं आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी आहे जे देशात अस्थिरता आणत आहेत. त्याचं एकच लक्ष्य जेथेही ते सत्ता मिळवतात तेथे ते मलाई खातात. एक स्थिर सरकार का महत्त्वाची असते, हे महाराष्ट्राशिवाय कोणाला समजू शकते, असं म्हणत मोदींनी नागरिकांना परत एकदा भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. दरम्यान, काँग्रेस आणि 'इंडिआ' आघाडीचं केंद्रात जेव्हा-जेव्हा सत्ता राहिलीय तेव्हा-तेव्हा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय.

इंडिया आघाडीकडून विकासकामांना विरोध केला जात होता. सत्ता असतांना गरिबांसाठी आणलेल्या पीएम आवास योजनेचा लाभ मिळू दिला नाही. सत्ता आल्यावर फक्त लुटा, असा इंडिया आघाडीचा मंत्र असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. महाराष्ट्रातील विकासकामांना 'इंडिया' आघाडीने विरोध केला. विकासकामांच्या वेळी इंडिया आघाडीकडून दलाली मागितली जात होती.

जेव्हा 'इंडिया' आघाडीने अनेक कटकारस्थान करून राज्यात सत्तेत आले, तेव्हाही त्यांनी वसूलीचं धोरण ठेवलं. तसेच त्यांनी नागरिकांचं भलं केलं नाही, तर त्यांनी आपल्याच परिवाराचा विकास केला. कोणाला कोणता कंत्राट मिळेल. कोणाला कुठून कमीशन मिळेल. जास्त मलाईदार पोस्ट कोणाच्या खात्यात आहे, हेच पाहिलं. त्यांच्या याच हिशोबामुळे महाराष्ट्राचं भविष्य खराब केलं. महाराष्ट्राच्या विकाससाठी आणलेल्या विकासकामांना इंडिया आघाडीने विरोध केला. महाराष्ट्रातील विकासकामे पाहिली का ते कमीशन मागत होते.कमीशन द्या किंवा नाहीतर काम बंद करा असं 'इंडिया' आघाडीकडून सांगण्यात येत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com