रत्नागिरीत आमच्या एनडीएच्या सर्वच कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. खूप वर्षांनी भाजपला रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघाची जागा मिळाली आहे. आम्हांला खात्री आहे मंत्री नारायण राणे (narayan rane) माेठ्या मताधिक्यानी विजयी हाेतील, येथे कमळ फुलेल. नरेंद्र मोदी (pm modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारतात एक लाट असल्याचे गाेव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमाेद सावंत (goa cm dr pramod sawant) यांनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात आज महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणे हे लाेकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. या निमित्त महायुतीचे कार्यकर्ते रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथे माेठ्या संख्येने दाखल हाेत आहे. गाेव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमाेद सावंत हे देखील राणेंच्या रॅलीत सहभागी हाेणार आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील. संकल्प पत्र पूर्ण करण्याचा संकल्प भाजपने ठेवलेला आहे. आम्ही मागचे दोन संकल्प 99 टक्के पूर्ण केलेले आहेत. मोठे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये घेतील. तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपला देश पुढे येईल.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आता तर भाजपचाच उमेदवार
नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाजपला ही जागा दिली आहे. राणे हे माेठ्या मताधिक्याने विजयी हाेतील तर अडीच लाखांच्या मताधिक्याने विनायक राऊत यांचा पराभव हाेईल असेही मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले. विनायक राऊत यांना गतवेळी भाजपची साथ मिळाली हाेती. त्यामुळे ते विजयी झाले हाेते. आता तर येथे खूद्द भाजपची उमेदवारी आहे. त्यामुळे येथे कमळ फुलणार हे निश्चित असे डाॅ. सावंत यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.