Sangli Constituency: कोणता पैलवान माझ्याविरोधात अधिक ताकदवान ठरेल हे तेव्हाच ठरेल; संजयकाका पाटलांचा विशालसह चंद्रहार पाटलांना लगावला टाेला

महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या बाईक रॅलीस सुरुवात झाली आहे. काँग्रेस भवन समोरून जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशी जोरदार घोषणाबाजी केली.
sanjaykaka patil fills form for sangli lok sabha consituency
sanjaykaka patil fills form for sangli lok sabha consituencySaam Digital

Sanjaykaka Patil :

दोन टर्म खासदार म्हणून चांगले काम केल्याने लोक यावेळे कामाची पोचपावती म्हणून आताही मला चांगले मताधिक्य देऊन निवडून देतील असा विश्वास खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. सांगली लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी आज (गुरुवार) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

संजयकाका म्हणाले जनता ही अदालत आहे. 10 वर्ष जो लोकांना उपलब्ध आहे, त्याच्या मागे लोक मागे राहत असतात. मविआ मधील तिकिटांचा सुरू असलेला घोळ आणि बंडखोरी आपल्या पथ्यावरच ठरेल असे आम्ही मानत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदी यांचे आणि भाजपचे काम याच्या जोरावर आम्ही मते मागू. प्रचारात रंगत आल्यावरच कोणता पैलवान माझ्याविरोधात अधिक ताकदवान ठरेल हे मला समजेल असा टाेला संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांना लगावला.

sanjaykaka patil fills form for sangli lok sabha consituency
Satara Constituency: उदयनराजेंना शरद पवार प्रखर विराेध करताहेत? दमयंतीराजेंनी स्पष्टच सांगितलं (पाहा व्हिडीओ)

दरम्यान संजय काका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या दुचाकी रॅलीस प्रारंभ झाला आहे. त्यानंतर सांगली येथील स्टेशन चौकामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. या सभेच्या ठिकाणी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. सांगलीची राजकीय परिस्थिती आणि होणाऱ्या घडामोडीवर आज सभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

sanjaykaka patil fills form for sangli lok sabha consituency
Konkan Politics : भाजपनं नारायण राणेंना शेवटच्या बाकावर बसवलं : वैभव नाईक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com