Mumbai Election Results 2024: मुंबईत ठाकरेंची शिवसेना सुसाट, शिंदे गटाची पिछेहाट; भाजपला फक्त एकच जागा

Maharashtra Lok Sabha Election Result Latest Update : लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठं यश मिळालं आहे. मुंबईत सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय झाले आहेत.
मुंबईत ठाकरेंची शिवसेना सुसाट, शिंदे गटाची पिछेहाट; भाजपला फक्त एकच जागा
Mumbai Election Results 2024Saam Tv

मुंबईत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. 6 पैकी 4 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. तर एक जागेवर काँग्रेस आणि एक जागेवर भाजपने विजय मिळवला आहे.

पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले होते. ज्यात त्यांना घवघवीत यश मिळालं आहे. लोकसभेच्या या विजयामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाल्याचं, असल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

मुंबईत ठाकरेंची शिवसेना सुसाट, शिंदे गटाची पिछेहाट; भाजपला फक्त एकच जागा
Smriti Irani News : लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा झटका, अमेठीतून स्मृती इराणी यांचा पराभव

अरविंद सावंत यांची हॅट्रिक

दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा ५४,००० मतांनी पराभव केला आहे. विजयानंतर अरविंद सावंत म्हणल्वे आहेत की, ''आनंद याचा आहे की, प्रत्येक वेळी मोदींचा चेहरा देऊन जिंकलो. मात्र, आज मला मोठा आनंद याचा आहे की, मोदीजींच्या चेहऱ्याशिवाय आम्ही जिंकलो. उद्धवजींचा चेहरा घेऊन जिंकलो.''

दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांचा विजय

दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे. शेवाळे येथून सलग दोनदा निवडून आले होते. मात्र यंदा त्यांना देसाई यांनी हॅट्रिक करू दिली नाही. देसाई यांनी ५३,३८४ मतांनी शेवाळे यांचा पराभव केला आहे.

मुंबईत ठाकरेंची शिवसेना सुसाट, शिंदे गटाची पिछेहाट; भाजपला फक्त एकच जागा
Narayan Rane: नारायण राणेंनी फोडला ठाकरेंचा बालेकिल्ला; रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊतांचा पराभव

ईशान्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्येही ठाकरे गटाचा विजय

ईशान्य आणि उत्तर पश्चिममध्येही ठाकरे गटाला मोठं यश मिळालं आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला आहे. तसेच उत्तर पश्चिम मुंबईमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा पराभव केला आहे.

अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड विजय

उत्तर मध्य मुंबईत आज भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे. तर उत्तर मुंबईत भाजपने गड राखला आहे. येथून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काँग्रेस उमेदवार भूषण पाटील यांचा पराभव केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com