मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाने ठाेकला शड्डू, उमेदवार निवडीचे सर्वाधिकार जरांगे पाटलांना

महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात व सगे सोयरे हा अध्यादेश काढला. त्याचे कायद्यात रूपांतर न झाल्याने मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना मराठा समाजात आहे.
maratha community to contest maval lok sabha constituency
maratha community to contest maval lok sabha constituencysaam tv

Maval Lok Sabha Constituency :

मावळ विधानसभा क्षेत्रातील सकल मराठा समाजाची बैठक लोणावळ्यात नुकतीच झाली. मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले असून सकल मराठा समाजाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात व सगे सोयरे हा अध्यादेश काढला. त्याचे कायद्यात रूपांतर न झाल्याने मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना मराठा समाजात आहे.

maratha community to contest maval lok sabha constituency
Lonavala Crime News : वेताळबाबा टेकडीवर पाेलिसांचा छापा, जुगार खेळणा-या नऊ जणांना अटक, लाखाचा मुद्देमाल जप्त

मावळातील सकल मराठा समाज देखील राज्य शासनावर प्रचंड नाराज झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशा स्वरूपाची भूमिका लोणावळा सकल मराठा विभागाच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवार यांच्या मतांवर परिणाम होण्याची वर्तवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मावळ विधानसभा क्षेत्रातील समाजाची भूमिका जाणून घेऊन त्याचा अहवाल आज (शनिवार) मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मावळ लोकसभेची दिशा ठरवण्यात येईल असेही मराठा समाजाने स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

maratha community to contest maval lok sabha constituency
Jayant Patil On BJP Mission 45 Plus : महायुतीचे उमेदवार ठरण्यापूर्वीच काेल्हापूर, सातारा लाेकसभा मतदरासंघात जयंत पाटलांचा विजयाचा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com