Lok Sabha Election 2024: सलग 238 निवडणूक हरला, तरी 239 व्यांदा पुन्हा मैदानात! कोण आहे पद्मराजन?

Who is K Padmarajan: कभी कभी हारकर जितने वालें को बाजीगर नही, के के पद्मराजन कहते है. तामिळनाडूतले के के पद्मराजन हे निवडणूकीत आपलं डिपॉझिट जप्त करायलाच जन्माला आले की काय? असा प्रश्न तुम्हालाही पडेल.
Who is K Padmarajan
Who is K PadmarajanSaam Tv

>> प्रसाद जगताप

Lok Sabha Election 2024:

तब्बल २३८ वेळा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिला. पण, एकदाही नाही जिंकला. एकदा नाही दोनदा नाही, तर हा माणूस निवडणुकीत तब्बल २३८ वेळा हरलाय, याचे लाखो रुपये डिपॉझीटमध्ये जप्त झालेत. तरीही पिळदार मिशा, आणि गळ्यात चमकीचा गमछा घालून हा पठ्ठ्या २३९वी निवडणूक हरायला मैदानात उतरलाय.

अटल बिहारी वाजपेयींपासून ते मनमोहन सिहांपर्यंत आणि मनमोहन सिहांपासून ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत.. सगळ्यांच्या विरोधात हा पिळदार मिश्या असणारा माणूस निवडणूक लढलाय. प्रत्येकवेळा याचं अक्षरश: डिपॉझीट जप्त झालंय. पण तरीही याला निवडणूक लढवायला आणि पराभूत व्हायला लै आवडतं. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण या माणसाठी अपयश हे अख्या आभाळ इतकं आहे. कारण याच्या परभावांमुळेच हा लोकांच्या चर्चेचा विषय ठरलाय. कोण आहे हा माणूस? का लढतो हा इतक्या निवडणुका? नेमकं कारण काय आहे ? जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Who is K Padmarajan
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची 8वी यादी जाहीर, हंसराज हंस यांच्यासह या नेत्यांना मिळाली संधी

कभी कभी हारकर जितने वालें को बाजीगर नही, के के पद्मराजन कहते है. तामिळनाडूतले के के पद्मराजन हे निवडणूकीत आपलं डिपॉझिट जप्त करायलाच जन्माला आले की काय? असा प्रश्न तुम्हालाही पडेल. कारण या पठ्ठ्याने निवडणुकीच्या रिंगणात उभं राहून, आपलं डिपॉझिट जप्त करायच्या बाबतीत भावी पंतप्रधान अभिजित बिचकुलेंचाही रेकॉर्ड तोडलाय.  (Latest Marathi News)

टायर पंक्चरचं दुकान चालवणाऱ्या के के पद्मराजन यांची निवडणुकीत तब्बल २३८ वेळा हवा निघालीये. आणि तरीही २३९व्यांदा ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

इलेक्शन किंग म्हणून आपली एक वेगळीच ओळख असणारा हा माणूस डेंजर आहे. याने सरपंचपदापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत सगळ्या निवडणुका बिनशर्त हरल्या.. कोण म्हणतं हे जग फक्त जिंकणाऱ्या माणसांना लक्षात ठेवतं, हरणाऱ्या, तोंडघशी पडणाऱ्या लोकांना पण लक्षात ठेवतं/ लक्षात काय तर, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही दखल घेतली जाते. फक्त के के पद्मराजन सारखं हरण्यात सातत्य पाहीजे..

के के पद्मराजन यांनी ११९८ पासून हरायला आय मिन निवडणूक लढवायला सुरुवात केली. १९९८ पासून ते आत्तापर्यंत त्यांनी अटल बिहरी वाजपेयी, मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींना निवडणुकीत आव्हान दिलंय आणि सलग २३८ वेळा निवडणुकीत डिपॉझिट जप्त केलंय. निवडणुकीचं डिपॉझिट जप्त करुन के के पद्मराजन यांचे अक्षरश: लाखो रुपये असेच जप्त झालेत. म्हणजे निवडणूक आयोगाचा फायदाच फायदा.

Who is K Padmarajan
BJP Manifesto 2024: भाजपने जाहीरनामा समिती केली जाहीर; राजनाथ सिंह असतील अध्यक्ष, समितीत या बड्या नेत्यांचाही समावेश

आता तुम्ही म्हणाल टायर पंक्चरच्या दुकानात काम करुन हा माणूस लाखो रुपये कसा काय उधळू शकतो? तर टायर पंक्चरच्या दुकानाव्यतिरीक्त पद्मराजन एक चांगले होमिओपॅथी डॉक्टर पण आहेत.

लोकं पद्मराजन यांच्यावर हसतात, त्यांची खिल्ली उडवतात.. पण, पद्मराजन लोकांना अजिबात सिरिअसली घेत नाही.. कारण लोकांना जिंकण्यात आनंद आहे. पण, पद्मराजन यांना निवडणुका हरण्यात एक वेगळीच नशा आहे. एक सामान्य माणूसही निवडणूक लढवू शकतो, हे पद्मराजन यांना दाखवायचंय.. पण यावरुन एक साधा प्रश्न आहे.. एक साधा माणूस निवडणूक लढवू शकतो. हे पद्मराजन यांना २३८ वेळा का दाखवायचं असेल? असो.. पद्मराजन यांनी हरलेल्या सगळ्या निवडणुकांच्या त्यांच्याजवळ आजही निशाणी आहेत. म्हणून तर यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com