Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची 8वी यादी जाहीर, हंसराज हंस यांच्यासह या नेत्यांना मिळाली संधी

Bjp Releases the 8th List: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये ओडिशा, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
BJP Lok Sabha Candidates
BJP Lok Sabha CandidatesSaam Tv

Lok Sabha Election 2024:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये ओडिशा, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार दिनेश सिंह यांना गुरुदासपूरमधून, तरनजीत सिंग संधू अमृतसरमधून, सुशील कुमार रिंकू जालंधरमधून, हंसराज हंस फरीदकोटमधून आणि प्रनीत कौर पतियाळामधून निवडणूक लढवणार आहेत.

यावेळी लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP Lok Sabha Candidates
BJP Manifesto 2024: भाजपने जाहीरनामा समिती केली जाहीर; राजनाथ सिंह असतील अध्यक्ष, समितीत या बड्या नेत्यांचाही समावेश

भाजपच्या आठव्या यादीत ओडिशातील 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये जाजपूर येथील रवींद्र नारायण बेहरा, कंधमाल येथील सुकांत कुमार पाणिग्रही आणि कटक येथील भर्त्रीहरी महताब यांचा समावेश आहे. पंजाबमधून 6 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.  (Latest Marathi News)

याशिवाय पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 2 जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रणत तुडू झारग्राममधून तर, देबाशीष धर (IPS) बीरभूममधून निवडणूक लढवणार आहेत.

BJP Lok Sabha Candidates
Bihar Lok Sabha: एलजेपीने उमेदवारांची यादी केली जाहीर, चिराग पासवान हाजीपूरमधून निवडणूक लढवणार

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी 2 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली होती. यात अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना पक्षाने तिकीट दिले. विद्यमान खासदार ए नारायणस्वामी यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांना कर्नाटकच्या चित्रदुर्गातून तिकीट देण्यात आले. राणा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक अमरावतीमधून अपक्ष म्हणून जिंकली होती. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते अनंतराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com