Madha Lok Sabha Election 2024 : 'माढा'तील प्रचाराचा नारळ 'या' तालुक्यातून फुटणार, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुती सज्ज

madha lok sabha election 2024 : अकलूजच्या माेहिते पाटील गटाचे धैर्यशील माेहिते पाटील यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
mahayuti to begin prachar of ranjitsinh naik nimbalkar from malshiras madha lok sabha constituency
mahayuti to begin prachar of ranjitsinh naik nimbalkar from malshiras madha lok sabha constituencysaam tv

Madha Lok Sabha Constituency :

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीने (mahayuti) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचाराचा नारळ फाेडण्याचे जाेरदार नियाेजन सुरु केले आहे. भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) यांच्या प्रचाराचा प्रारंभ महायुती माढा मतदारसंघातील माळशिरस येथून केला जाणार आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लाेकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीमधील माेहिते पाटील गटाने कडाडून विराेध दर्शविला आहे. फलटणच्या नाईक निंबाळकर गटाने देखील विद्यमान खासदारांशी मिळते जुळते घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

mahayuti to begin prachar of ranjitsinh naik nimbalkar from malshiras madha lok sabha constituency
Maval Lok Sabha Election 2024 : मावळ लाेकसभा मतदारसंघातून यशवंतभाऊ भाेसलेंना हवी महायुतीची उमेदवारी, कारण ही सांगितलं

दूसरीकडे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा माळशिरस मधून फाेडण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे कुलदैवत नीरा नरसिंगपुर येथे लक्ष्मी नरसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान याच मतदारसंघात महायुतीवर नाराज असलेल्या माेहिते पाटील गटाचे धैर्यशील माेहिते पाटील (dhairyasheel mohite patil)  यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

mahayuti to begin prachar of ranjitsinh naik nimbalkar from malshiras madha lok sabha constituency
Kolhapur Fire News: केर्लीत गोडाऊनला भीषण आग, 20 लाखांचे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com