Maval Lok Sabha Election 2024 : मावळ लाेकसभा मतदारसंघातून यशवंतभाऊ भाेसलेंना हवी महायुतीची उमेदवारी, कारण ही सांगितलं

Maharashtra Election 2024 : श्रमिक शेतकरी आणि कष्टकरी यांच्यातील मतदार हा जागा आहे. तो मतदानाच्या वेळी नक्की योग्य भूमिका घेईल असा इशारा देखील यशवंतभाऊ भाेसले यांनी यावेळी भाजपला दिला.
yashwantbhau bhosale wish to contest election from maval lok sabha constituency
yashwantbhau bhosale wish to contest election from maval lok sabha constituencysaam tv
Published On

Maval Lok Sabha Constituency :

महायुतीत मावळ लोकसभेची जागा शिवसेना की भाजप यापैकी नेमकं कुणाला जाणार याचा पेच कायम असताना भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ कामगार नेते तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची मागणी पक्षाकडे केल्याची माहिती भाेसलेंनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.  (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मावळ क्षेत्रातील बऱ्यापैकी भाग हा औद्योगिक असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात श्रमिक वर्ग वास्तव्यास आहे. या श्रमिक वर्गाच्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व लोकसभेत करण्यासाठी महायुतीत भाजपने मावळ लोकसभा क्षेत्राची जागा ज्येष्ठ कामगार नेता म्हणून मला द्यावी अशी अपेक्षा यशवंतभाऊ भोसले यांनी पक्षाकडे केल्याचे नमूद केले.

yashwantbhau bhosale wish to contest election from maval lok sabha constituency
Paduka Darshan Sohala 2024: नवी मुंबईत आजपासून 'श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा', भाविकांसाठी विनामूल्य प्रवेश

यशवंतभाऊ म्हणाले सध्याच्या राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. जो - तो नेता आपले पक्ष आणि पदाधिकारी सांभाळण्यात मश्गूल असल्याने श्रमिक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही आहे. या अस्थिर राजकीय परिस्थितीत श्रमिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महायुतीने माझी उमेदवारी जाहीर करावी.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान पक्षाने मला उमेदवारी दिली नाही तर मी बंड करून वेगळी भूमिका घेणार नाही असेही भाऊंनी स्पष्ट केले. ते म्हणाले श्रमिक शेतकरी आणि कष्टकरी यांच्यातील मतदार हा जागा आहे. तो मतदानाच्या वेळी नक्की योग्य भूमिका घेईल असा इशारा देखील भाऊंनी यावेळी भाजपला दिला.

Edited By : Siddharth Latkar

yashwantbhau bhosale wish to contest election from maval lok sabha constituency
Jayant Patil On BJP Mission 45 Plus : महायुतीचे उमेदवार ठरण्यापूर्वीच काेल्हापूर, सातारा लाेकसभा मतदरासंघात जयंत पाटलांचा विजयाचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com