Maharashtra Politics: राजकीय पक्षांचा जुना डाव, जुनी खेळी; शरद पवार अन् तटकरेंच्या नावांचे डमी उमेदवार

Lok Sabha Election 2024: मतदारांना चकवा देण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून, मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार उभे करत आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv

राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha) राजकीय रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचं दिसत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकास्त्राची खेळी देखील खेळली जात आहे. राज्यात तीव्रतेने राजकीय पक्ष विरोधी उमेदवारांची मते फोडण्यात कोणतीही (Maharashtra Politics) कसर सोडत नाहीत.

गेल्या काही वर्षांपासून, मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार उभे करत आहेत. उमेदवारांच्या नावामुळे मतदारांसमोर संभ्रम निर्माण (Lok Sabha Election 2024) होतो. त्याचा परिणाम मिळणाऱ्या मतांवर होताना दिसतो. मतदारांना चकवा देण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली जात आहे. हे वर्षही त्याला अपवाद ठरलं नाहीये.

पण इतिहासात पाहिलं आहे की, उमेदवारांच्या नावात साधर्म्य असल्यास प्रमुख उमेदवाराला मोठा फटका बसतो. आता रायगडमध्ये तटकरे आणि गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात (Namesakes To Make Poll Inroads) आहेत. राजकीय निरीक्षक प्रकाश पवार म्हणाले की, हा ट्रेंड 20 ते 25 वर्षांपूर्वी सुरू झाला होता. आता तो राज्यभर दिसत आहे. राज्यात मागील विधानसभा निवडणुकीत 20 हून अधिक आमदारांनी एक हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती.

रायगड लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अर्ज दाखल केले (Maharashtra Election) आहेत. मात्र, अनंत गीते नावाच्या आणखी दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. माजी मंत्री गीते यांना मत देऊ इच्छिणारे मतदार त्याच नावाप्रमाणे असलेल्या अपक्ष उमेदवारांना मतदान करतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार गीते यांच्या मतांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम; नाशिकमध्ये भुजबळांच्या माघारीनंतरही पेच सुटेना

'पवार विरुद्ध पवार' अशी लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार नावाच्या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार मतदारसंघातील मतदार गोंधळात पडू ( Maharashtra Politics) शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत, असे समजून मतदार ऑटो युनियनचे उमेदवार पवार यांना मतदान करू शकतात, असे बारामती येथील मतदार अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

या नावांच्या यादीमध्ये विनायक राऊत, कोल्हापुरात शाहू (Political Parties Make Namesakes) आणि मंडलिक अशी नावे असलेले उमेदवार, हातकणंगले मतदारसंघात माने आडनाव असलेले चार उमेदवार, सुशील कुमार शिंदे, या नावांचा समावेश आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात 2014 चा 'सेम टू सेम' पॅटर्न चर्चेत?; कुणाचं गणित बिघडणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com