Maharashtra Politics 2024 : कोण होणार पुण्याचा खासदार?; भाजपची हॅटट्रिक की काँग्रेसचं कमबॅक?

Lok Sabha Election 2024 : पुणे म्हटलं की काँग्रेस, 2014 पर्यंत राजकीय पटलावर पुण्याची ओळख अशी होती, मात्र त्यानंतर चित्र बदललं. 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा भाजपने पुण्यात विजय मिळवला आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital

पुणे म्हटलं की काँग्रेस, 2014 पर्यंत राजकीय पटलावर पुण्याची ओळख अशी होती, मात्र त्यानंतर चित्र बदललं. 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा भाजपने पुण्यात विजय मिळवला. पुण्यातील विधानसभा महापालिका या सगळ्याचं संख्याबळ पाहिलं तर सध्या भाजपचं काँग्रेसला वरचढ आहे. याच भाजपच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. धंगेकर हे सध्या पुण्यातील काँग्रेसचे लोकप्रिय नेते आहेत. तर भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. धंगेकर आणि मोहोळ दोनही उमेदवार हे तितकेच लोकप्रिय आणि मोठा जनसंपर्क असलेले नेते आहेत तर वंचितकडून वसंत मोरे हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.. त्यामुळे पुणे लोकसभेची लढत जोरदार होणार आहे.

रवींद्र धंगेकरांची राजकीय कारकीर्द

- चार वेळा नगरसेवक

- शिवसेना, मनसेनंतर काँग्रेसमध्ये

- 2009 ला कसब्यात बापटांविरोधात केवळ 7 हजार मतांनी पराभव

- कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला

मुरलीधर मोहोळ यांची राजकीय कारकीर्द

- चार वेळा नगरसेवक

- पुण्याचे महापौर

- अध्यक्ष, स्थायी समिती

- उपाध्यक्ष, महापौर परिषद

- संचालक, पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन

- संचालक, पीएमपीएमएल

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे गटाला ‘गिव्ह अँड टेक' ऑफर, ठाण्याच्या बदल्यात हवी नाशिकची जागा?

मागील दोन निवडणउकांप्रमाणे यंदाची निवडणूक ही भाजपसाठी एकतर्फी नसणार आहे. मात्र असं असलं तरी धंगेकर यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहेत. तर मोहोळ यांच्या जमेच्या बाजू अधिक आहेत.

रवींद्र धंगेकरांच्या जमेच्या बाजू

- वैयक्तिक लोकप्रियता

- सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख

- मतदारसंघात मोठा जनसंपर्क

- ठाकरे गट आणि पवार गटाचा पाठिंबा

मुरलीधर मोहोळ यांच्या जमेच्या बाजू

- 100 नगरसेवकांचं पाठबळ

- पक्ष संघटनेची मोठी ताकद

- सहा पैकी पाच आमदारांची ताकद

- मतदारसंघात मोठा जनसंपर्क

पुणे लोकसभेमध्ये दोन्ही उमेदवार तगडे आहेत. त्यामुळे आताच आडाखे बांधणं थोडं कठिण आहे.. त्यामुळे पुण्यात कोण सरस ठरणार मोहोळ की धंगेकर यांची उत्सुकता असणार आहे.

Maharashtra Politics 2024
Eknath Khadse: एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला? स्थानिक राजकारणाचा अडसर, की दुसरं काही?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com