Maharashatra Election: शरद पवारांचा महायुतीला पुन्हा धोबीपछाड; उत्तम जानकरांचा शरद पवारांना पाठिंबा

Uttam Jankar : धैर्यशील मोहितेंनी बंडाचा झेंडा फडकावल्यामुळे माढ्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. नाराज असलेल्या उत्तम जानकरांना विधानसभेचा शब्द देऊन गळाला लावण्यात पवारांना यश आलं.
Maharashatra Election:  शरद पवारांचा महायुतीला पुन्हा धोबीपछाड; उत्तम जानकरांचा शरद पवारांना पाठिंबा
Uttam Jankar

Maharashtra Election Uttam Jankar : देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या सर्व ऑफर धुडकावून अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकरांनी थेट विरोधकांना साथ देण्याचा निर्णय घेतला. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी वेळापूर इथं जानकरांनी जाहीर सभेचं आयोजन केलं होतं. मोहिते पाटलांना माढ्यातून तर बारामतीतून सुप्रिया सुळेंना विजयी करण्याचा एल्गार जानकरांनी केलाय. अजितदादांचा पराभव केल्यानंतरच पक्ष सोडणार असल्याचं वक्तव्यही जानकरांनी केलंय.

जानकरांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश आलंय. पण वेळापूरच्या जाहीर सभेतच उत्तम जानकरांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली. मोहिते पाटलांचं भाषण सुरू असतानाच जानकरांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी जाहीर सभेतच जानकरांची विधानसभेची उमेदवारी घोषित करून टाकली.

राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. गेल्या 30 वर्षांचं वैर संपवून माढ्यात मोहिते पाटील आणि जानकर एकाच मंचावर आले. मोहिते पाटलांसह जानकरांना पक्षात घेऊन शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिलाय.धैर्यशील मोहितेंनी बंडाचा झेंडा फडकावल्यामुळे माढ्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. नाराज असलेल्या उत्तम जानकरांना विधानसभेचा शब्द देऊन गळाला लावण्यात पवारांना यश आलं. मोहिते पाटलांसह जानकरांनासोबत घेऊन पवारांनी माढ्यासह सोलापूर लोकसभा सुरक्षित केल्याचं बोललं जातंय.

मोहिते पाटील आणि जानकरांनी भाजपच्या पराभवासाठी एल्गार पुकारलाय. जानकरांनी थेट अजित पवारांविरोधात जाहीर भूमिका घेऊन बंडाचा झेंडा फडकावलाय. भाजपसह महायुतीच्या सर्व खेळीनंतर शरद पवारांनी अखेरचा डाव टाकला आणि माढ्यात मोहिते पाटलांसह जानकरांना सोबत घेतलं. एकापाठोपाठ दोन मोहरे गळाला लावण्यात पवारांना यश आलं. मोहिते पाटलांसह जानकरांची आपापल्या मतदारसंघात स्वतंत्र ताकद आहे. तीच ताकद आता मविआच्या बाजूने आल्यानं महायुतीला धक्का बसणार हे निश्चित.

Maharashatra Election:  शरद पवारांचा महायुतीला पुन्हा धोबीपछाड; उत्तम जानकरांचा शरद पवारांना पाठिंबा
Maharashtra Election: विखेंचा निरोप घेऊन उद्योगपती पवारांच्या भेटीला? निलेश लकेंच्या उमेदवारीवरून पवारांचा गौप्यस्फोट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com