Sharad Pawar News: मोदी आणि पुतीन यांच्यात फरक नाही; शरद पवार यांचं PM मोदींवर टीकास्र

Sharad Pawar Meet Vijaysinh Mohite Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झालेत.
Sharad Pawar On PM Narendra Modi
Sharad Pawar On PM Narendra Modisaam tv

अक्षय बडवे, प्रतिनिधी|ता. १४ एप्रिल २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झालेत. शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे, फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकरांसह अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले शरद पवार?

"भाजपने (BJP) जाहीरनाम्यात काय आश्वासन दिले यावर भाष्य करणे आता योग्य नाही. नुसते आश्वासने देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ईडी,सीबीआयचा गैरवापर करणे हे मोदींचे सूत्र आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. पुतीन आणि मोदी यांच्यामध्ये काही फरक नाही.." असा मोठा घणाघात शरद पवार यांनी यावेळी केला.

"पंतप्रधानांबद्दल (PM Narendra Modi) बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. त्यांची अनेक भाषणे पंतप्रधानपदाला शोभण्यासारखी नाहीत. पाठीमागच्या जाहीरनाम्यामधील अनेक आश्वासने पुर्ण केली नाहीत. आज नेहरू यांना जाऊन किती वर्ष झाले त्यांचे योगदान काय आहे होतं हे ऐतिहासिक आहे. मात्र पंतप्रधान नेहरूंवरही टीका करतात," असेही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar On PM Narendra Modi
Bhandara Accident: भरधाव ट्रॅकच्या धडकेत शिक्षिका ठार, भंडारा जिल्ह्यात हळहळ

प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते विजयी होणार..

"माढामध्ये आमची इच्छा होती की धैर्यशील यांनी ही निवडणूक लढवावी. आज जयंत पाटील या ठिकाणी येतील आणि त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल. १६ तारखेला माढा आणि सोलापूर संदर्भात बैठक होईल. एकत्रपणे काम करण्याचा निर्णय झाला आहे. प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते हे मोठ्या मताने विजयी होतील अशी खात्री सहकाऱ्यांनी दिल्याचेही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar On PM Narendra Modi
Shirpur Accident : मजुरांनी भरलेली गाडी उलटली; मुलीचा मृत्यू, १९ जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com