lok Sabha Election Exit Poll : दक्षिणेत इंडिया आघाडी की एनडीए? एक्झिट पोलमधून समोर आली चक्रावून टाकणारी आकडेवारी

lok Sabha Election Exit Poll update : देशात लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यावर एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलमधून दक्षिण भारतातील जागांची माहिती समोर आली आहे. दक्षिणेतील चक्रावून टाकणारी आकडेवारी समोर आली आहे.
दक्षिणेत इंडिया आघाडी की एनडीए? एक्झिट पोलमधून समोर आली चक्रावून टाकणारी आकडेवारी
PM Narendra Modi on Rahul Gandhi Saam TV

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण सात टप्प्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज शनिवारी सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर देशासहित दक्षिण भारतातील जागांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यामध्ये एक्झिट पोलमध्ये तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA)जागा दाखवण्यात आल्या आहेत.

कर्नाटक -

एबीपी- सी व्होटर

एनडीए - २३

इंडिया - ४

इतर - १

केरळ

एबीपी - सी व्होटर

एनडीए - २

इंडिया - १८

इतर - १

तामिळनाडू -

एबीपी -सी व्होटर

एनडी - २

इंडिया - ३७

इतर - ००

दक्षिणेत इंडिया आघाडी की एनडीए? एक्झिट पोलमधून समोर आली चक्रावून टाकणारी आकडेवारी
Loksabha Election Exit Poll: भाजप ३७० पेक्षा जास्त जागा जिंकणार; भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्ड यांचा दावा

आंध्र प्रदेश

एपीबी सी-व्होटर

एनडीए - २२

इंडिया - ००

इतर -००

दक्षिणेत इंडिया आघाडी की एनडीए? एक्झिट पोलमधून समोर आली चक्रावून टाकणारी आकडेवारी
Maharashtra exit poll 2024 : राज्यात मविआ आणि महायुतीला किती जागा मिळणार? एक्झिट पोलचा अंदाज काय?

दक्षिण भारतातील जागांचे एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. यावर सकाळ समूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार यांनी महत्वाचं मत व्यक्त केलं आहे. श्रीराम पवार म्हणाले, 'दक्षिण भारतात केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपला अधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा कोणाची नाही. तिथे त्यांनी खाते उघडले तरी खूप झालं. जागा किती मिळाल्या, यापेक्षा भाजपची मतसंख्या वाढेल, हे मोठं आहे. यामुळे पुढील समीकरण बदलण्यास सुरुवात होईल. दोन्ही राज्यात किती जागा मिळतात, हे बघावे लागेल'

'चंद्रबाबू नायडू आणि भाजप हे फार काळ जमणारे समीकरण नाही. दोघे कायमस्वरुपी सोबत राहतील, याची शक्यता नाही. चंद्रबाबू नायडू यांच्याशी जुळवून घेतलं हे भाजपचं शहाणपण होतं. त्यामुळे यश मिळताना दिसत आहे. यातील धक्का देणार कल हा, कर्नाटकातील आहे. कर्नाटकात २४ जागा , या जागा अधिकच्या वाटत आहे. जर खरं झालं तर धर्मनिरपेक्ष जनता दलाशी जुळवून घेण्याची रणनीती यशस्वी झाली, असं म्हणावं लागेल, असे श्रीराम पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com