Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी सर्व उमेदवारांना दिलं विजयाचं आश्वासन; भाजप आणि NDA आघाडीतील मित्रपक्षांच्या उमेदवारांना लिहिलं पत्र

PM Narendra Modi Letter To BJP And NDA Candidate: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व उमेदवारांनी विजयाचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी भाजप आणि एनडीए आघाडीतील मित्रपक्षांच्या उमेदवारांना पत्र लिहिलेलं आहे.
PM Narendra Modi Letter To BJP And NDA Candidate
PM Narendra Modi Letter To BJP And NDA CandidateSaam Tv

प्रमोद जगताप साम टीव्ही प्रतिनिधी मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं (PM Narendra Modi Letter) भाजप आणि एनडीए आघाडीतील मित्रपक्षांच्या उमेदवारांना पत्र लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व उमेदवारांना विजयाचं आश्वासन दिलं आहे. तुम्ही सर्व जनतेच्या आशीर्वादाने संसदेत पोहोचाल. तुम्हाला मिळालेले प्रत्येक मत हे मजबूत सरकारच्या दिशेने एक पाऊल असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

एक टीम म्हणून मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असं आश्वासन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलं आहे. या पत्रातील माझा संदेश मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवाल, असं नरेंद्र मोदी उमेदवारांना म्हटले आहेत. तामिळनाडूचे भाजप उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई आणि उत्तराखंडच्या गढवाल मतदार (Lok Sabha Elections 2024) संघाचे उमेदवार अनिल बलूनी यांना लिहिलेल्या पत्राची प्रत समोर आली आहे. प्रत्येक राज्यातील उमेदवाराला स्थानिक भाषेत पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे.

PM Modi Letter
PM Modi LetterSaam Tv

पंतप्रधान मोदींनी उमेदवारांना लिहिलेल्या पत्रात नक्की आहे तरी काय? हे आपण जाणून घेऊ या. भारतीय जनता पार्टी माझे सहकारी कार्यकर्ते अनिल बलूनी जी, राम नवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक (Modi Letter To BJP And NDA Candidate) शुभेच्छा. हे पत्र तुम्हाला लिहित असताना, मला आशा आहे की तुम्ही चांगले आहात. भारतीय जनता पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला नेहमीच मेहनत करताना पाहिले आहे, असं पंतप्रधान त्यांच्या पत्रात म्हटले आहेत.

राज्यसभा खासदार या नात्याने तुम्ही उत्तराखंडच्या विकासाशी निगडित मुद्दे आवाजाने मांडलेत आणि पक्षाची बाजू मीडियासमोर सहज आणि सक्षमपणे मांडली. गढवाल लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी (PM Narendra Modi) आणि येथील जनतेच्या सेवेसाठी तुमचे प्रयत्न या परिसराला नव्या उंचीवर नेतील. मला विश्वास आहे की, तुम्ही लोकांचा पूर्ण आशीर्वाद संसदेत आणाल आणि नवीन सरकारमध्ये आम्ही सर्व मिळून देशवासीयांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.

PM Narendra Modi Letter To BJP And NDA Candidate
PM Modi Interview: 'वन नेशन, वन इलेक्शन'वर नरेंद्र मोदी यांनी केलं मोठं वक्तव्य

तुमच्यासारखे उत्साही सहकारी मला संसदेत बळ देतील. मी तुमच्या लोकसभा मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की, ही निवडणूक काही सामान्य निवडणूक (Politics) नाही. ही निवडणूक म्हणजे आपले वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी आहे. काँग्रेसच्या पाच-सहा दशकांच्या कारकिर्दीत आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबातील ज्येष्ठांनी ज्या त्रासाला सामोरे जावे लागले, त्यातून दिलासा मिळण्याचा हा निवडणूक महत्त्वाचा क्षण आहे.

गेल्या दशकभरात समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून देशवासीयांच्या अनेक अडचणी दूर केल्या आहेत. यावेळी आम्हाला मिळालेले प्रत्येक मत 2047 पर्यंत एक मजबूत सरकार बनवण्याच्या आणि भारताचा विकास (Elections 2024) करण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती देईल. निवडणुकीपूर्वीचे शेवटचे तास खूप महत्वाचे आहेत, म्हणून मी तुमच्यामार्फत सर्व कार्यकर्ता सहकाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्याची विनंती करतो. माझी सर्व मतदारांना नम्र विनंती आहे की, उन्हाचा तडाखा आणि इतर गैरसोयी सहन करूनही राष्ट्र उभारणीची ही संधी सोडू नका. शक्य असल्यास सकाळी लवकर मतदान करा. माझ्या वतीने तुम्ही सर्व मतदारांना हमी द्यावी की, मोदींचा प्रत्येक क्षण देशवासीयांच्या नावावर आहे. निवडणुकीतील विजयासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, असं मोदींनी त्यांच्या पत्रात लिहिलेलं आहे.

PM Narendra Modi Letter To BJP And NDA Candidate
PM Modi: देव आणि धार्मिक स्थळांच्या नावावर मागितली मते? PM मोदींविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com