'वन नेशन, वन इलेक्शन'वर नरेंद्र मोदी यांनी केलं मोठं वक्तव्य
Pm Modi On One Nation One ElectionSaam Tv

PM Modi Interview: 'वन नेशन, वन इलेक्शन'वर नरेंद्र मोदी यांनी केलं मोठं वक्तव्य

PM Narendra Modi Live: लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच देशात 'वन नेशन, वन इलेक्शन' धोरण लागू होणार, अशी चर्चा आहे. यावरच बोलताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Published on

Pm Modi Lok Sabha Election Interview:

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच देशात 'वन नेशन, वन इलेक्शन' धोरण लागू होणार, अशी चर्चा आहे. यावरच बोलताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ''वन नेशन, वन इलेक्शनसाठी आमची कटिबद्धता आहे. अनेक लोकांनी यासंबंधित समितीला आपल्या सूचना दिल्या आहेत. अनेक सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना आल्या आहेत. जर आम्ही हा अहवाल अंमलात आणू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल.''

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे कोणी घाबरण्याची गरज नाही. कोणाला घाबरवण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही, आम्ही देशाच्या विकासासाठी निर्णय घेतले. विरोधकांच्या आरोपांबाबत पंतप्रधान मोदींना विचारले असता ते म्हणाले की, पराभवासाठी विरोधकांना काही तरी निमित्त हवे आहे. पराभवासाठी ते थेट स्वत:ला दोष देऊ शकत नाहीत. त्यामुळे ईव्हीएम आणि तपास यंत्रणांना दोष दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com