Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील ८ मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष

Lok Sabha Elections News: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज शुक्रवारी पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण १३ राज्यांमधील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
Lok Sabha Election 2024 phase two Voting Today
Lok Sabha Election 2024 phase two Voting Today ANI/Twitter

Lok Sabha Election 2024 Voting Updates

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज शुक्रवारी पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण १३ राज्यांमधील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. यासाठी तब्बल १, २०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Lok Sabha Election 2024 phase two Voting Today
Bhujbal Vs Munde: भुजबळांच्या बालेकिल्ल्यावर मुंडेंचा डोळा, भुजबळ विरुद्ध गोडसेंच्या भांडणात पंकजा मुंडेंचा फायदा होणार का?

याआधी १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान घेण्यात आलं होतं. त्यावेळी ६५.५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. पहिल्या टप्प्यात काही भागांमध्ये मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला, तर काही ठिकाणी लोकांनी मतदानकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. आज मतदार नेमका काय प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ८ जागांसाठी मतदान

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ८ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, या मतदारसंघाचा समावेस आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात किती टक्के मतदान होतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातील ८ मतदारसंघात अशी होणार लढत

  • अकोला मतदारसंघ: भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे अभय काशिनाथ पाटील यांच्यात लढत होईल.

  • बुलढाणा मतदार संघ: शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर

  • अमरावती मतदारसंघ: भाजपच्या उमेदवार नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे

  • वर्धा मतदारसंघ: भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शरद काळे

  • यवतमाळ - वाशिम मतदारसंघ: शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख

  • हिंगोली मतदारसंघ: शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कोहलीकर विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर

  • नांदेड मतदारसंघ: भाजपचे प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात थेट लढत होईल.

  • परभणी मतदारसंघ: रासपचे महादेव जानकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळेल.

Lok Sabha Election 2024 phase two Voting Today
Maharashtra Election: शिरूरमधून भुजबळांना उमेदवारी देण्याचा होता प्लॅन; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com