Bhujbal Vs Munde: भुजबळांच्या बालेकिल्ल्यावर मुंडेंचा डोळा, भुजबळ विरुद्ध गोडसेंच्या भांडणात पंकजा मुंडेंचा फायदा होणार का?

Nashik Loksabha Election: प्रीतम मुंडेंना नाशिकमधून निवडणुकीसाठी उभं करू असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यावर 'पंकजा मुंडेंनी बीडकडे लक्ष द्यावं.', असा टोला भुजबळांनी हाणलाय. तर 'प्रीतम मुंडेंचा योग्य मान राखू.', असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय.
Nashik Loksabha Election
Bhujbal Vs MundeSaam Tv
Published On

छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यावर मुंडेंचा डोळा आहे का?, असा सवाल आता विचारला जातोय. कारण प्रीतम मुंडेंना नाशिकमधून निवडणुकीसाठी उभं करू असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यावर 'पंकजा मुंडेंनी बीडकडे लक्ष द्यावं.', असा टोला भुजबळांनी हाणलाय. तर 'प्रीतम मुंडेंचा योग्य मान राखू.', असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. दरम्यान भुजबळ विरुद्ध गोडसेंच्या भांडणात पंकजा मुंडेंचा फायदा होणार का पाहुयात या रिपोर्टमधून...

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीचा तिढा सुटता सुटत नाही तोच पंकजा मुंडेंनी बीडच्या सभेतून केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झालाय. प्रीतम मुंडेंना नाशकातून उतरवणार असल्याचा दावा पंकजा मुंडेंनी केलाय. यावरून अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंकजांना बीडमध्येच लक्ष देण्याचा सल्ला दिलाय.

Nashik Loksabha Election
Nashik Lok Sabha: नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम? NCP पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनं राजकीय चर्चांना उधाण

राजकारणात एक काळ असा होता जेव्हा पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन कधी होणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र बीडमध्ये प्रीतम मुंडेंचाच पत्ता कट झाल्यानंतर आता त्यांचं काय होणार याची चर्चा रंगलीय. दुसरीकडे महायुतीत छगन भुजबळ यांची अवहेलना होत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय. पंकजा मुंडेंना आपल्या बहिणीच्या राजकीय भविष्याची चिंता सतावतेय. म्हणूनच पंकजाताईंनी नाशिकच्या जागेवर खडा टाकून बघितला. मात्र नाशकात सक्षम वंजारी नेतृत्व असल्याचं सांगून भुजबळांनी पंकजांताईंचा मनसुबा उधळून लावलाय.

Nashik Loksabha Election
PM Modi : आम्ही त्यांच्या शिव्याही खाऊ आणि देशसेवाही करू: पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

- महायुतीकडून नाशिकमध्ये तीन वंजारी उमेदवारांचा पर्याय असल्याचं भुजबळ म्हणालेत.

- यामध्ये भाजपचे बाळासाहेब सानप, हेमंत धात्रक आणि शिंदे गटाचे उदय सांगळे यांचा समावेश आहे.

- बाळासाहेब सानप हे नाशिक पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

- सानप यांनी नाशिक महानगरपालिकेत महापौर आणि भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी भूषवलीय.

- तर हेमंत धात्रक हे भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत.

- क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आहेत.

- शिंदे गटाकडुन उदय सांगळे सक्रिय असून युवा नेतृत्त म्हणून त्यांची ओळख आहे..

- सिन्नर तालुक्यात उदय सांगळे यांचं चांगलं वर्चस्व आहे.

त्यामुळे नाशिकचा तिढा नाशकातल्या उमेदवारानेच सोडवला जाईल. मुंडेंनी नाशकात येऊ नये असा सूचक सल्ला भुजबळांनी दिलाय.

Nashik Loksabha Election
Madha Lok Sabha: माढ्यात भाजपची ताकद वाढली, देवेंद्र फडणवीसांची नवी खेळी; उत्तम जानकरांना मोठा धक्का

छगन भुजबळांनी माघार घेतली असली तरीही नाशिकचा बालेकिल्ला अजित पवार गटाकडे राहावा म्हणून ते आग्रही आहेत. दुसरीकडे हेमंत गोडसेही माघार घ्यायला तयार नाहीत. अशा स्थितीत पंकजा मुंडेंची भुजबळांच्या बालेकिल्ल्यावर नजर पडलीय. आता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Nashik Loksabha Election
Pune Loksabha: रविंद्र धंगेकरांसाठी काँग्रेसचे दिग्गज मैदानात; राहुल गांधी- प्रियांका गांधी पुण्यात रोड शो करणार!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com