Madha Lok Sabha: माढ्यात भाजपची ताकद वाढली, देवेंद्र फडणवीसांची नवी खेळी; उत्तम जानकरांना मोठा धक्का

Madha Loksabha Constituency: माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसला आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदार (Madha Loksabha Constituency) संघ हा पश्चिम महाराष्ट्रामधील महत्वाचा मतदार संघ आहे. या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदार संघामध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. अशामध्ये या मतदार संघामध्ये भाजपची ताकद वाढली आहेत. माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसला आहे.

माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणार आहे. त्यामुळे माढ्यात भाजपाची ताकद आणखी वाढली असल्याचे म्हटले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही आणखी एक मोठी खेळी असल्याचे म्हटले जात आहे. माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकार्‍यांनी देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी त्यांनी माढा मतदारसंघात भाजपाच्या बाजुने उभे राहण्याचे आश्वासन दिले.

Devendra Fadnavis
Varsha Gaikwad: मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतील महाविकास आघाडीचा तिढा सुटला; वर्षा गायकवाड यांना उमेदवारी

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी हा दिलासा आहे. पण उत्तम जानकर यांना हा मोठा धक्का आहे. देवेद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून माढा लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माळशीरस तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षीत आघाडीच्या माध्यमातून पाठिंबा देत आहोत. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना कसल्याही परिस्थितीमध्ये विजयी केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis
Kolhapur Politics: सावध राहा! नाहीतर ते फोटो व्हायरल करेन; सतेज पाटलांचा संजय मंडलिक यांना इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com