Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणींत वाढ; PM मोदींचा एकेरी उल्लेख भोवला, नगरमध्ये गुन्हा दाखल

Sanjay Raut Controversial Statement On PM Modi: पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य करणं संजय राऊतांना भोवलं आहे. त्यांच्यावर आठ दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संजय राऊत
Sanjay RautSaam Tv
Published On

सुशील थोरात, साम टीव्ही अहमदनगर

पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य करणं संजय राऊतांना भोवलं आहे. त्यांच्यावर आठ दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानावर तब्बल आठ दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं नगरमधून समोर आलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत.

चौथ्या टप्प्यात नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघाची (Lok Sabha 2024) निवडणूक पार पडली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वत: संजय राऊत मैदानात उतरले होते. नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी ८ मे रोजी अहमदनगरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती.

या सभेत बोलताना संजय राऊत यांनी औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता, असा दावा केला (Sanjay Raut Controversial Statement On PM Modi) होता. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलं तर तू कोण? असा पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख देखील संजय राऊत यांनी केला होता. त्या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अतुल काजळे या पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत
Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात भादंवि कलम 171( क) 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 123 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचाराच्या काळात राजकीय नेते एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करत असतात. परंतु संजय राऊतांनी मोदींवर (PM Modi) केलेलं वक्तव्य काहीसं अंगलट आल्याची स्थिती दिसत आहे. आता राऊतांवर नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संजय राऊत
Nashik Lok Sabha: आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा, शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com