राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. पाचव्या टप्प्यात राज्यात १३ जागांवर मतदान होणार आहे. आता या १३ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर होणार आहे.
आज मुंबईत (Mumbai Lok Sabha 2024) उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी आणि महायुतीची सभा होणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता राजकीय रंगत पाहायला मिळतेय. आज शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा पार पडणार आहे. महायुतीच्या सहा उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वत: रिंगणात उतरले आहेत. या सभेसाठी मनसेने टिझर देखील प्रसिद्ध केला आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी या जागांवर विजय मिळविण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे. राज्यातील शेवटच्या टप्प्यात प्रचाराची सांगता उद्या होणार आहे. त्याआधी आज इंडिया आघाडीची सभा (Mumbai News) मुंबईतील बीकेसी मैदानावर होत आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या या सभेत इंडिया आघाडीने मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढलाय. आज शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार (Maharashtra Politics) आहे. ऐरोली विधानसभा क्षेत्रात वाशी ते ऐरोलीपर्यंत हा रोड शो होणार आहे. ठाणे लोकसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठची आहे. तेथे मोठं शक्ती प्रदर्शन आज करण्यात येणार आहे.
उद्धव सेनेने आजच्या सभेसाठी मुंबई महापालिकेकडे शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली होती. परंतु मनसेनेही आज होणाऱ्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, म्हणून अर्ज केला होता. हे मैदान मनसेला सभेसाठी (PM Modi Sabha) देण्यात आलं. त्यामुळे इंडिया आघाडीला आजच्या सभेसाठी बीकेसी मैदान निवडावं लागलं. इंडिया आघाडीच्या आजच्या सभेला बीकेसी मैदानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.