Nashik Lok Sabha: आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा, शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन

Shantigiri Maharaj Rally: लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा आज पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा
NashiK Lok SabhaSaam Tv

अजय सोनवणे साम टीव्ही, नाशिक

लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा आज पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.

धुळे लोकसभा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मैदानात (Shantigiri Maharaj Rally) उतरले आहेत. त्यांची आज मालेगावात सभा पार पडणार आहे. नाशिक जिल्ह्यात आज सभांचा धुराळा उडणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होत आहे. नाशिकमध्ये आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचाराचा धुराळा उडाल्याचं दिसत आहे.

आज नाशिक (NashiK Lok Sabha) जिल्ह्यातील मालेगावात या सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात आज राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे तसेच वंचीतचे प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभेच्या तोफा धडाडणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यात १३ ठिकाणी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे उमेदवार शक्तीप्रदर्शन (Nashik News) करत आहे. नाशिकमध्ये आज जंगी रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा
Nashik Lok Sabha 2024: नाशिकमध्ये आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; ५ व्या टप्प्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे अन् PM मोदींची सभा

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचं आज जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शांतिगिरी महाराजांनी भव्य प्रचार रॅली काढली (Maharashtra Election 2024) आहे. नाशिकच्या गोदाघाटावरून रॅलीला सुरुवात झाली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रचार रॅलीवर भर देत आहेत. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर भक्तगण सामील झाले होते.

नाशिकमध्ये प्रचार सभांचा धुराळा
Nashik Lok Sabha Election: महाजन अचानक भुजबळांच्या भेटीला का आले? तर्क वितर्कांना उधाण, नाशकात काय घडतंय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com