PM Modi Speech : मागच्या जन्मात माझा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला होता; पंतप्रधान मोदींना असं का वाटलं?

PM Modi Speech at Malda rally : तुमचं इतकं प्रेम बघून असं वाटतं की मागल्या जन्मात मी पश्चिम बंगालमध्ये जन्मलो होतो किंवा पुढच्या जन्मात पश्चिम बंगालमधील आईच्या पोटी जन्म घेईल, असं काळजाला हात घालणारं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदामध्ये झालेल्या प्रचारसभेत केलं.
PM Modi Speech at Malda rally
PM Modi Speech at Malda rallySAAM TV

तुमचं इतकं प्रेम बघून असं वाटतं की मागल्या जन्मात मी पश्चिम बंगालमध्ये जन्मलो होतो किंवा पुढच्या जन्मात पश्चिम बंगालमधील आईच्या पोटी जन्म घेईल, असं काळजाला हात घालणारं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदामध्ये झालेल्या प्रचारसभेत केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज, शुक्रवारी मतदान होत आहे. सकाळपासूनच लोक मोठ्या उत्साहानं लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहेत. जे लोक मतदानासाठी बाहेर पडलेत त्यांचे अभिनंदन करतो. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेससारखे पक्ष पहिल्या टप्प्यातील मतदानातच पराभूत झाले आहेत, असा मला विश्वास आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, 'एकेकाळी पश्चिम बंगाल संपूर्ण देशाच्या विकासाचं नेतृत्व करत होता. मात्र आधी डावे पक्ष आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी बंगालच्या या महान परंपरेला इजा पोहोचवली. बंगालची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. विकास थांबवला. तृणमूलच्या सत्ताकाळात बंगालमध्ये फक्त हजारो कोटींचे घोटाळे चालतात. घोटाळे तृणमूल काँग्रेस करतो आणि त्याचा भुर्दंड येथील जनतेला बसतो.'

मालदातील प्रचारसभेत उपस्थित जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, 'तुमचं इतकं प्रेम पाहून असं वाटतं की मागील जन्मात पश्चिम बंगालमध्ये जन्मलो होतो किंवा पुढच्या जन्मी पश्चिम बंगालमधील एखाद्या मातेच्या पोटी जन्माला येईल.'

PM Modi Speech at Malda rally
PM Modi: देव आणि धार्मिक स्थळांच्या नावावर मागितली मते? PM मोदींविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

बंगालमधील ५० लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचे ८ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. पण इथलं तृणमूल काँग्रेसचं सरकार तुमची लूट करण्याची एकही संधी सोडत नाही. केंद्र पश्चिम बंगालच्या विकासासाठी इथल्या सरकारला जे पैसे पाठवतो, ते तृणमूलचे नेते, मंत्री खातात, असा गंभीर आरोपही मोदींनी यावेळी केला.

'मां-माटी-मानुष'ची घोषणा करून सत्तेत आलेल्या तृणमूलनं इथल्या महिलांचा सर्वात मोठा विश्वासघात केला. इथल्या मुस्लिम भगिनींना अत्याचारापासून वाचवण्यासाठी तीन तलाक संपुष्टात आणला, तेव्हा तृणमूलनंच विरोध केला. संदेशखालीमध्ये महिलांवर अत्याचार झाले आणि तृणमूलच्या सरकारनं आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी मोदींनी काँग्रेस आणि तृणमूलवरही जोरदार हल्लाबोल केला. तुष्टीकरणासाठी हे दोन्ही पक्ष काहीही करू शकतात. देशहितासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय बदलू शकतात. या दोन पक्षांमध्ये जणू स्पर्धाच सुरू आहे. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना वसवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही मोदींनी केला.

PM Modi Speech at Malda rally
सुषमा अंधारेंमुळे मनिषा कायंदेंपासून नीलम गोऱ्हेंपर्यंत सर्वांनी पक्ष सोडला : रुपाली चाकणकर, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com