Exit Polls 2024: मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल दाखवू नका, निवडणूक आयोगाच्या सूचना

Lok Sabha Election 2024: आज सातव्या टप्प्यातील मतदानानंतर वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखवले जातील. यातच एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने पुन्हा आपल्या जुन्या सूचनांचा पुनरुच्चार केला आहे.
मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल दाखवू नका, निवडणूक आयोगाच्या सूचना
Exit Poll UpdatesSaam TV

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (१ जून) मतदान होणार आहे. यानंतर सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान संपेल. सर्व 543 जागांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. आज सातव्या टप्प्यातील मतदानानंतर वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखवले जातील. यातच एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने पुन्हा आपल्या जुन्या सूचनांचा पुनरुच्चार केला आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान संपल्यानंतर किमान अर्ध्या तासापर्यंत कोणताही एक्झिट पोल प्रसिद्ध करू नये, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी सांगितले. आहे.

मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल दाखवू नका, निवडणूक आयोगाच्या सूचना
Lok Sabha Election: चमत्कार काँग्रेसला तारणार? निकालापूर्वी काँग्रेसचा अंतर्गत अहवाल, महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीचा विश्वास

म्हणजे मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल दाखवला जाणार नाही. याआधी काँग्रेसने विविध टीव्ही चॅनेल्सवरील एक्झिट पोल संर्दभाती चर्चेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले

काँग्रेसने म्हटले आहे की, त्यांचे नेते लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलशी संबंधित चर्चेत भाग घेणार नाहीत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मतदारांनी मतदान केले आहे आणि त्यांचा निर्णय सुरक्षित आहे. 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी आम्हाला टीआरपीसाठी सट्टा आणि वादविवाद करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही."

मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल दाखवू नका, निवडणूक आयोगाच्या सूचना
Exit Polls वरील चर्चेवर काँग्रेसचा बहिष्कार, काय आहे कारण? जाणून घ्या

ते म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार नाही. पक्षाच्या निर्णयाचे कारण सांगून ते म्हणाले, "कोणत्याही चर्चेचा उद्देश लोकांना माहिती देणे हा असला पाहिजे. आम्ही 4 जूनपासून होणाऱ्या चर्चेत आनंदाने सहभागी होऊ.'' दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाचा शेवट टप्पा आज (शनिवारी) आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com