Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Fadanvis Vs Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटलांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिल्यानंतर माढ्यात आरपारची लढाई होण्याची चिन्हं आहेत. पाहुयात हा रिपोर्ट..
Maharashtra Politics:  फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई
Fadanvis Vs Mohite Patil saam tv

Maharashtra Politics madha constituency Fadanvis Vs Mohite Patil : निवडणुकीनंतर माझी तुरुंगात जाण्याचीही तयारी असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलंय. माढ्यातील सभेतून देवेंद्र फडणवीसांनी मोहिते-पाटील घराण्यावर सडकून टीका केली होती. मोहिते-पाटील घराण्याची दहशत माढ्यातून संपवणार असं फडणवीस म्हणाले होते. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटलांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिल्यानंतर माढ्यात आरपारची लढाई होण्याची चिन्हं आहेत. पाहुयात हा रिपोर्ट..

माढा लोकसभेची लढत आता प्रतिष्ठेची झाली असून फडणवीस, पवार आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: माढ्याच्या मैदानात उतरलेत. माढ्यातून मोहिते पाटील घराण्याची दहशत संपवणार असा इशाराच फडणवीसांनी दिलाय.

फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही आरपारच्या लढाईची खूणगाठ बांधलीय. फडणवीसांचा दबाव झुगारून तुरुंगात जाण्याचीही तयारी असल्याचं धैर्यशील मोहितेंनी म्हटलंय. दरम्यान राजकीय मंचावर माढ्याची लढत धैर्यशील मोहीतेविरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी दिसतेय. मात्र राजकीय पडद्याआड शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची लढत झालीय.

भाजपकडून माढ्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांची घोषणा होताच पवारांनी पहिला डाव टाकला.नाराज मोहिते पाटील घराण्याला आपल्या बाजुने करून धैर्यशील पाटलांना उमेदवारी दिली. अजित पवार गटाच्या उत्तम जानकर यांनाही सोबत घेऊन फडणवीस-अजितदादांना दुहेरी धक्का दिला.शरद पवारांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी अभयसिंह मोहिते पाटलांना आपल्याकडे वळवलं. पवारांचे विश्वासू अभिजीत पाटील यांनाही आपल्यासोबत घेत पवारांवर पलटवार केलाय

माढ्याच्या राजकीय लढतीत घमासान युद्ध सुरु असून दोन्ही योद्ध्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. देवेंद्र फडणवीसांनी मोहिते पाटलांची दहशत संपवण्याचा इशारा दिलाय. तर मोहिते पाटलांवर प्रेम करणाऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी दाखवून धैर्यशील मोहितेंनी दंड थोपटलेत. त्यामुळे आता माढ्याची जनता कुणाला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Maharashtra Politics:  फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई
Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com